best plants for bathroom decor, plants that helps to absorb moisture in bathroom and keep it fresh
बाथरुममध्ये कुबट- दमट वाटतं? 'ही' रोपं बाथरुमच्या कोपऱ्यात ठेवा, कोंदटपणा कमी होऊन फ्रेश वाटेलPublished:December 5, 2024 03:37 PM2024-12-05T15:37:18+5:302024-12-05T15:56:19+5:30Join usJoin usNext बाथरुम ही अशी जागा असते जी दिवसातून अधिकाधिक काळ ओलसर, दमट राहते. त्यात तिथे व्यवस्थित व्हेंटीलेशन नसतं. त्यामुळे हवा खेळती राहात नसल्याने ते कोंदट, कुबट वाटतं. बऱ्याचदा तर दुर्गंधीही येते.(plants that helps to absorb moisture in bathroom and keep it fresh) म्हणूनच तुमच्या बाथरुममधला दमटपणा, कुबटपणा कमी करण्यासाठी बाथरुममधे काही रोपं ठेवून पाहा. ही रोपं बाथरुम प्लांट्स म्हणून ओळखली जातात आणि ती बाथरुममधील दमट, कुबट हवा शोषून घेतात. (best plants for bathroom decor) सगळ्यात पहिलं आहे ॲस्पार्गस फर्न. छोट्याशा कुंडीतही येऊ शकणारं हे रोपं बाथरुममध्ये ठेवण्यासाठी उत्तम आहे. फक्त त्याला पुरेसं ऊन मिळालं पाहिजे. दुसरं आहे स्पायडर प्लांट. हे रोप इनडोअर, आऊटडोअर अशा कोणत्याही वातावरणात छान वाढू शकतं. त्यामुळे त्यांची खूप काही देखभाल करावी लागत नाही. तिसरं आहे स्नेक प्लांट. स्नेक प्लांटही इनडोअर आहे. त्यामुळे कमी सुर्यप्रकाशातही ते चांगलं वाढतं. हार्ट लीफची एखादी छोटीशी कुंडीही तुम्ही बाथरुमच्या खिडकीत ठेवू शकता. या रोपाला २ ते ३ तास चांगलं ऊन मिळालं पाहिजे. तर बाथरुममध्ये तेवढं ऊन येत नसेल तर एक दोन दिवसांआड ते बाथरुममधून काढून १- २ तासांसाठी बाहेर उन्हात ठेवा आणि नंतर पुन्हा बाथरुममध्ये ठेवा. ZZ प्लांटलाही उत्तम बाथरुम प्लांट मानलं जातं कारण बाथरुममधला कोंदटपणा शोषून ते हवा शुद्ध करण्यास मदत करतं. टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सGardening TipsPlants