DIY: महागडे हँगिंग प्लॅन्टर विकत कशाला आणायचे? घरच्याघरी बनवा देखणे प्लॅन्टर, जुन्या वस्तुंना सुंदर रूप By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 12:58 PM 1 / 10१. घराबाहेर किंवा गॅलरीबाहेरच्या छोट्याशा जागेतही कुंड्या लटकवून छान बाग फुलवता येते.. हँगिंग कुंड्यामुळे जागा लहान असली तरी भरपूर झाडं लावण्याची हौसही भागते. त्यासाठीच तर या बघा काही खास आयडिया.(how to make hanging planters at home)2 / 10२. असं हँगिग गार्डन फुलविण्यासाठी महागड्या कुंड्या विकत घेण्याची अजिबात गरज नाही. थोडासा वेळ दिला आणि थोडीशी कलात्मकता वापरली तर घरातल्याच जुन्या वस्तू वापरून (DIY- hanging planters) आपण अगदी सुरेख पद्धतीने झाडे लावू शकतो.3 / 10३. आपल्या घरात गेलेले बल्ब नेहमीच पडलेले असतात. बल्ब गेला की तो आपण सरळ उचलतो आणि फेकून देतो. पण त्या बल्बचा असा छान उपयोग करता येतो. आर्टिफिशियल फुलंही तुम्ही यात ठेवू शकता. 4 / 10४. काचेच्या बाटल्यांचाही आपल्याला तसाच उपयोग करता येईल. या पाण्यात थोडे स्पार्कल रंग टाकले, तर ते आणखी छान दिसू शकेल. 5 / 10५. नारळाच्या करवंट्या वापरून तुम्ही असे आकर्षक हँगिंग प्लॅन्टर तयार करू शकता. यासाठी आधी करवंटी साफ करून घ्या. तिला छान रंग द्या. त्यानंतर त्यात माती टाकून रिप प्रकारची रोपटी तुम्ही यात लावू शकता.6 / 10६. या जुन्या झालेल्या पाण्याच्या बाटलीपासून किती आकर्षक पद्धतीने प्लॅन्टर तयार करता येतं, याचं हे एक उत्तम उदाहरण. बाटली एक बाजूने आणि वरच्या बाजूने कापायची आणि सगळीकडून तिला छोट्या छोट्या काड्या लावून सजवायचं.. मस्त प्लॅन्टर झालं तयार. 7 / 10 ७. टायरचा उपयोगही अशा पद्धतीने हँगिंग प्लॅन्टर तयार करण्यासाठी होऊ शकतो. टायरच्या आता माती टाकून हे प्लॅन्टर तयार केलं आहे. मनीप्लॅन्ट किंवा रिप प्लॅन्ट यात चांगले येऊ शकतात. 8 / 10 ८. पाणी, कोल्ड्रिंक अशा बाटल्या मधोमध कापा. खालच्या भागाला छान रंग द्या आणि त्यात अशा पद्धतीने छोटी छोटी झाडं लावून ती घराबाहेर, बाल्कनीत लटकवा.9 / 10९. जुन्या झालेल्या पर्सचाही किती छान उपयोग करता येतो, हे यातून दिसून येतं. पर्सच्या आतले सगळे लहान- लहान कप्पे कापून टाका आणि त्यात माती टाकून असे छान प्लॅन्टर तयार करा.10 / 10 १०. अशा लाकडी स्टिक अनेक ठिकाणी मिळतात. या स्टिकचा वापर करूनही असे आकर्षक प्लॅन्टर करता येतात. आणखी वाचा Subscribe to Notifications