खत- पाणी वेळेवर देऊनही झाडं सुकत आहेत? ५ गोष्टी करून पाहा- सुकलेली रोपं पुन्हा नव्याने बहरतील By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2023 11:34 AM 1 / 7बऱ्याचदा झाडांची व्यवस्थित काळजी घेऊनही ती सुकत जातात. फांद्या, कळ्या मान टाकून देतात. झाडांची पानं पिवळी पडत जातात. असं झालं की मग आपलं नेमकं काय चुकत आहे तेच कळत नाही.2 / 7तुमच्या झाडांच्या बाबतीतही असं होत असेल तर ५ गोष्टी करून पाहा. सुकलेल्या रोपट्यांना पुन्हा नव्याने बहार येईल. 3 / 7सगळ्यात आधी तर झाडांना व्यवस्थित सुर्यप्रकाश मिळतो आहे की नाही ते तपासून पाहा. पुरेसा सुर्यप्रकाश मिळाला नाही तर रोपं सुकून जातात.4 / 7दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती पाणी घालत आहात ते तपासा. कारण पाणी कमी झालं तर झाडं सुकतात आणि जास्त झालं तर पानं पिवळी पडतात. त्यामुळे पाण्याचं प्रमाण चुकतंय का हे बघा.5 / 7बऱ्याचदा मातीतला कस कमी झाल्यानेही रोपं चांगली वाढत नाहीत. असं असेल तर मातीमध्ये कांद्यांच्या टरफलांचं पाणी, केळीच्या सालींचे पाणी, बेकिंग सोडा- व्हिनेगर- साखर यांचं ४८ तास फर्मेंट झालेलं मिश्रण असं काही टाकून पाहा. मातीचा पोत सुधारेल.6 / 7झाडांवर रोग पडला असेल तरीही त्याची वाढ खुंटते. त्यामुळे रोपट्याला एकदा व्यवस्थित काळजीपुर्वक पाहा. मुंग्या लागत असतील, रोग पडला असेल तर औषधांची फवारणी करा.7 / 7झाडांची छाटणी केल्यानेही चांगला फायदा होईल. सुकत चाललेल्या झाडाची योग्य पद्धतीने छाटणी करा. त्याला पुन्हा नवा बहर येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications