उन्हाळ्यात मिरची, भेंडीसह 'या' ७ भाज्यांची रोपं लावा, घरच्या बागेतूनच मिळेल आठवडाभराची ताजी भाजी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 3:15 PM 1 / 9कुंडीतल्या भाज्यांची वाढ चांगली होण्यासाठी त्यांना हवामान अनुकूल पाहिजे. काही ठराविक भाज्यांच्या वाढीसाठी उन्हाळा अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे त्या भाज्यांच्या बिया आतापासूनच म्हणजे मार्च महिन्यातच तुम्ही लावायला पाहिजे.2 / 9अशा उन्हाळ्यात भरभरून येणाऱ्या भाज्या कोणत्या याविषयीचा व्हिडिओ myplantsmygarden या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 3 / 9यामध्ये सांगितलेले सगळ्यात पहिली भाजी आहे भेंडी. उन्हाळ्यात भरपूर भेंडी पाहिजे असेल तर आताच तिच्या बियांची खरेदी करून टाका.4 / 9उन्हाळ्याच्या दिवसात एखाद्या मोठ्या पसरट कुंडीमध्ये किंवा टबमध्ये तुम्ही कांदाही लावू शकता.5 / 9मिरची लावण्यासाठी छोटी कुंडीही पुरेशी आहे. मिरचीचं रोप उन्हाळ्यात भरभरून वाढेल.6 / 9एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये दुधीभोपळाही चांगला लागतो. मात्र यासाठीची कुंडी खोलगट आणि मोठी असावी.7 / 9टोमॅटोचं रोपही तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता. सध्याचं हवामानही टोमॅटोच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल आहे. 8 / 9कारल्याच्या बियाही या दिवसात लावून पाहा. मोठ्या पसरट कुंडीमध्ये हे रोप लावा. 9 / 9गवार, बीन्स अशा शेंगांच्या वाढीसाठीही हा ऋतू चांगला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications