तुळस डेरेदार होतच नाही, पानंही हिरवीगार नसतात? किचनमधले २ पदार्थ वापरा- लगेच बहरेल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2024 9:02 AM 1 / 6बऱ्याचदा असं होतं की तुळस खूपच सुकल्यासारखी दिसते. तुळशीच्या रोपाकडे पाहिलं तर पानांपेक्षा तिच्या काड्याच जास्त दिसतात. 2 / 6काही जणांच्या घरच्या तुळशीच्या रोपाची पानंही छान हिरवीगार नसतात. ती पिवळट, चॉकलेटी रंगाची होत जातात. असं तुमच्याही तुळशीच्या बाबतीत झालं असेल तर काय उपाय करावा पाहा...3 / 6तुळशीला जर पुन्हा एकदा छान हिरवीगार, डेरेदार करायची असेल तर एक सोपा घरगुती उपाय पाहा. हा उपाय loveforgardening85 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.4 / 6यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की तुमच्या स्वयंपाक घरातलेच दोन पदार्थ तुळशीसाठी उत्तम खत ठरू शकतात. यासाठी सगळ्यात आधी तर १ ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये अर्धा टेबलस्पून आंबट दही टाका.5 / 6आता याच पाण्यात २ ते ३ चिमूट हळद टाका. हे पाणी व्यवस्थित हलवून घ्या आणि ते तुळशीला द्या. 6 / 6हा उपाय महिन्यातून एकदा केल्यास तुळशीची खूप छान वाढ होईल आणि काही दिवसांतच ती हिरवीगार- डेरेदार दिसेल. आणखी वाचा Subscribe to Notifications