कुंडीमध्ये लावता येतील 'या' मसाल्यांची रोपं, करा प्रयोग- घेऊन पाहा घरच्या मसाल्यांचा स्वाद By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2024 9:21 AM 1 / 10आपल्या स्वयंपाक घरातले काही मसाले असे आहेत, ज्यांची रोपं तुम्हाला तुमच्या घरच्या छोट्याशा बागेत अगदी सहज लावता येतील. 2 / 10ती मसाल्यांची रोपं कोणती याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ myplantsmygarden या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.3 / 10मसाल्याच्या पदार्थांमध्ये तुम्हाला ओव्याचं रोप घरी छोट्याशा कुंडीतही लावत येईल.4 / 10तेजपत्ताही घरी लावता येतो आणि त्याला मध्यम आकाराची कुंडी लागते.5 / 10धने मातीत पेरून घरच्याघरी कुंडीत ताजी कोथिंबीरही घेता येते.6 / 10मध्यम आकाराच्या पसरट कुंडीत मिरचीचं रोपही छान येतं. 7 / 10घरातली थोडी बडिशेप कुंडीत टाकली तर बडिशेपेचं रोपही कुंडीत चांगलं उगवतं.8 / 10लवंगाचं रोपही कुंडीत लावता येतं. त्यासाठी आवश्यक असणारं हवामान व्यवस्थित राखता आलं पाहिजे.9 / 10घरच्याघरी हळदीचं रोपही लावता येतं.10 / 10मध्यम आकाराच्या पसरट कुंडीत आलंही लावल्या जाऊ शकतं, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications