झाडांची पानं सुकली- पिवळी पडून गळू लागली? रोपांना घाला 'पांढरं' पाणी- पुन्हा होतील हिरवीगार By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2024 10:18 AM 1 / 7बऱ्याचदा असं होतं की रोपांची पानं पिवळी पडून गळू लागतात. रोपं सुकू लागतात.2 / 7आपण त्यांना पाणी तर नियमितपणे देतो. पण तरी असं का होतं ते कळत नाही. तुमच्या झाडांची पानं पिवळी पडून गळत असतील तर त्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे झाडांना पोटॅशियम आणि नायट्रोजन कमी प्रमाणात मिळत आहे. त्यासाठीच हा एक घरगुती उपाय करून बघा.3 / 7सगळ्यात आधी वाटीभर तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर त्यांच्यात एक लीटर पाणी टाकून ते भिजत ठेवा. 4 / 7या पाण्यात अर्धी वाटी सोयाबीन घाला.5 / 7त्याचा पाण्यात थोडा बारीक चिरलेला कांदा घाला.6 / 7२० मिली व्हाईट व्हिनेगर घालून ते पाण्याचं भांडं प्लास्टिकच्या पिशवीने झाकून घ्या आणि २ ते ३ दिवस उन्हात राहू द्या.7 / 7२ ते ३ दिवसांत ते पाणी चांगलं फर्मेंट झालं की ते गाळून घ्या आणि झाडांना घाला. थोडं पाणी पानांवरही शिंपडा. यामुळे झाडांना योग्य ती पोषणमुल्ये मिळतील आणि त्यांची आणखी जोमात वाढ होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications