Join us   

झाडं लावण्याची हौस, पण बागेची काळजी घ्यायला वेळच नाही? ही ५ 'लो मेंटेनन्स' झाडं लावा- बाग छान फुलेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2023 12:34 PM

1 / 7
काही जणांना घराभोवती, बाल्कनीमध्ये, टेरेसमध्ये झाडं लावायला खूप आवडतं. पण झाडं नुसतीच लावून उपयोग नसतो. त्याची वेळच्यावेळी काळजी घ्यावी लागते. त्याला खत टाकावं लागतं. ऊन- पाणी किती मिळतंय याकडेही लक्ष द्यावं लागतं. तरच ती बाग छान फुलते.
2 / 7
पण झाडांची अशी काळजी घ्यायला वेळ नसेल, आणि वेगवेगळी झाडं लावण्याची मात्र भारीच हौस असेल तर तुम्ही अशी काही झाडं लावली पाहिजेत, ज्यांची खूप देखभाल करण्याची गरज नाही. म्हणूनच आता आपण अशी काही 'लो मेंटेनन्स' लागणारी झाडं पाहू जी 'लेझी गार्डनर्स'साठी खरोखरच उपयोगी ठरणारी आहेत.
3 / 7
यातलं सगळ्यात पहिलं आहे ऑफिसटाईम. छोट्याशा कुंडीतही हे खूप छान फुलतं आणि त्याचं त्याचं छान वाढत जातं. शिवाय त्याला भरपूर फुलंही येतात. या झाडाची विशेष काळजी घ्यावी लागत नाही.
4 / 7
दुसरं आहे स्नेक प्लान्ट. स्नेक प्लान्ट मध्ये उंच वाढणारी आणि ठेंगणं असे दाेन प्रकार आहेत. तुमच्याकडे कशी जागा उपलब्ध आहे, त्यानुसार या रोपट्याची निवड करा. हे झाड कमी सुर्यप्रकाशातही चांगलं वाढतं. शिवाय त्याला वारंवार पाणी घालण्याचीही गरज नाही.
5 / 7
झेड प्लान्ट किंवा ZZ Plant या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या झाडाची पानं चमकदार असतात. इनडोअर म्हणून हे झाड छान आहे. किंवा बाल्कनीत, अंगणात जिथे कमी सुर्यप्रकाश असतो, तिथे हे झाड ठेवा. या झाडालाही वारंवार पाणी देण्याची गरज नाही. कुंडीतली माती सुकली की २- ३ दिवसांतून एकदा पाणी दिलं तरी चालतं.
6 / 7
स्पायडर प्लान्ट हा प्रकारही खूप छान आहे. अगदी छोट्या कुंडीपासून ते मोठ्या कुंडीपर्यंत तुम्ही ते कशातही लावू शकता. या झाडाला वारंवार खत देण्याचीही गरज नाही. एखाद्या कारंजाप्रमाणे त्याचं ते छान फुलत, पसरत जातं.
7 / 7
ऑफिस टाईमप्रमाणेच चिनी गुलाब या रोपट्याचीही विशेष काळजी घ्यावी लागत नाही. त्याला वेगवेगळ्या रंगाची छान फुलं येतात. त्यामुळे ते तुमच्या बागेच्या सौंदर्यात निश्चितच भर घालतं. शिवाय लहान आकाराच्या कुंडीतही हे रोपटं खूप छान वाढतं.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सगच्चीतली बाग