रोपांना ताक घालण्याची याेग्य पद्धत कोणती? त्यात चूक केल्यास फुलण्याऐवजी कोमेजून जाईल बाग

Published:August 31, 2024 01:23 PM2024-08-31T13:23:35+5:302024-08-31T13:35:14+5:30

रोपांना ताक घालण्याची याेग्य पद्धत कोणती? त्यात चूक केल्यास फुलण्याऐवजी कोमेजून जाईल बाग

ताक हे आपल्यासाठी जसं आरोग्यदायी आहे, तसंच ते आपल्या बागेतल्या रोपांसाठीही खूप चांगलं आहे. त्यामुळे कुंडीतल्या रोपांना अधूनमधून ताकाचं टॉनिक द्यायला हवं, हे आपण नेहमीच ऐकत असतो. (how to give buttermilk to plants?)

रोपांना ताक घालण्याची याेग्य पद्धत कोणती? त्यात चूक केल्यास फुलण्याऐवजी कोमेजून जाईल बाग

पण रोपांना ताक कशा पद्धतीने द्यावं, हे अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा त्याचा उलटाच परिणाम रोपांवर होतो आणि मग आपली बाग फुलण्याऐवजी कोमेजून जाते. किंवा मग कुंडीतली माती ताकामुळे पांढरट होऊन जाते.(proper method of giving buttermilk to plant)

रोपांना ताक घालण्याची याेग्य पद्धत कोणती? त्यात चूक केल्यास फुलण्याऐवजी कोमेजून जाईल बाग

त्यामुळे जर ताकातल्या पौष्टीक गुणांचा उत्तम फायदा तुमच्या बागेतल्या रोपट्यांना मिळवून द्यायचा असेल तर रोपांना ताक देण्याची ही याेग्य पद्धत एकदा पाहून घ्या.(benefits of giving buttermilk to plant)

रोपांना ताक घालण्याची याेग्य पद्धत कोणती? त्यात चूक केल्यास फुलण्याऐवजी कोमेजून जाईल बाग

ताक कधीही जशासतसं रोपांना घालू नका. तुमच्याकडे साधारण १ ग्लास ताक असेल तर ते दोन ते अडीच लीटर पाण्यात मिसळा आणि ते पाणी रोपांना द्या.

रोपांना ताक घालण्याची याेग्य पद्धत कोणती? त्यात चूक केल्यास फुलण्याऐवजी कोमेजून जाईल बाग

रोपांना नेहमी आंबट पण ताजं असणारं ताक द्यावं. ३- ४ दिवसांपुर्वी करून ठेवलेलं शिळं ताक रोपांना देऊ नका.

रोपांना ताक घालण्याची याेग्य पद्धत कोणती? त्यात चूक केल्यास फुलण्याऐवजी कोमेजून जाईल बाग

बऱ्याच जणांना अशी सवय असते की ज्या ताकाला वास येतो किंवा जे ताक कडवट असतं, असं पिण्यासाठी योग्य नसणारं ताक ते रोपांना घालतात. पण हे अतिशय चुकीचं आणि रोपांसाठी नुकसानकारक ठरणारं आहे. जे ताक आपल्यासाठी पिण्यायोग्य नाही, ते रोपांसाठीही चांगलं नाही.