पावसाळ्यात अतिपाण्यामुळे कुंडीतल्या रोपांवर रोग पडतो! 'हा' पांढरा पदार्थ मातीत टाका-रोपं वाढतील जोमानं
Updated:July 22, 2024 18:35 IST2024-07-22T18:01:50+5:302024-07-22T18:35:15+5:30

सध्या सगळीकडेच पावसाचे दमदार आगमन झालेलं आहे. थोड्या- फार फरकाने सगळीकडेच बरा पाऊस पडत आहे. बऱ्याचदा पडलेला पाऊस शेतीसाठी पुरेसा नसला तरी आपल्या बागेत छोट्याशा कुंडीत लावलेल्या रोपांसाठी पुरेसा ठरतो.
कधीकधी सतत काही दिवस ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस पडतो. त्यावेळी रोपांना बरेच दिवस स्वच्छ सुर्यप्रकाश मिळत नाही. अशावेळी कुंडीतून पाण्याचा योग्य निचरा होत नसेल तर अतिपाण्यामुळे रोपांची मुळं खराब होतात. रोपांवर रोग पडतात. (how to keep our plants safe from the insects attack in monsoo
हा धोका पावसाळ्यात खूप वाढलेला असतो (best home remedies to keep plant safe from fungal and bacterial infection). त्यामुळेच अशावेळी तुमच्याही रोपांवर बुरशी दिसली, पानांना छिद्र पडलेली दिसली किंवा मग रोपांवर काळे छोटे किडे दिसू लागले तर किटक नाशक औषध फवारण्यापुर्वी हा एक सोपा उपाय करून पाहा.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला कापूर वापरायचा आहे. कुंडीतल्या मातीत एक ते दिड इंच खोल छोटासा खड्डा करा आणि त्यात कापुराच्या बिया पेरून ठेवा. (use of camphor for gardening and plant growth)
१ बादली पाण्यात अर्धी वाटी कापूराची पावडर टाका. हे पाणी रोपांवर शिंपडा तसेच रोपांच्या मातीतही टाका. यामुळेही रोपांवरचं फंगल बॅक्टेरियल इन्फेक्शन निघून जाईल आणि रोपं छान हिरवीगार होतील. इन्फेक्शन निघून गेल्यामुळे फुलंही भरपूर येतील.