Join us   

रोपांना महिन्यातून एकदा द्या 'हे' जादुई पाणी! बाग होईल हिरवीगार- विकतचं खत टाकण्याची गरजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 9:21 AM

1 / 7
आपल्या स्वयंपाक घरातूनच असे बरेच पदार्थ तयार होऊ शकतात जे आपल्या छोट्याशा बागेसाठी खूप छान टॉनिक म्हणून काम करतात.(how to make bio-enzyme for plants at home?)
2 / 7
हल्ली नर्सरीमध्ये रोपांना देण्यासाठी बायोएन्झाइम मिळते. १०० ते १५० रुपयांना १ लीटर एवढी त्याची किंमत असते. पण असं महागडं खत रोपांना देण्यापेक्षा घरच्याघरी अगदी फुकट बायोएन्झाइम कसं तयार करायचं ते पाहा..(best home made fertilizers for plants)
3 / 7
हे खत तयार करण्यासाठी आपल्याला गूळ आणि स्वयंपाक घरात तयार होणारा ओला कचरा लागणार आहे. यासाठी एका प्लास्टिकच्या बाटलीमध्ये थोडा गूळ घ्या.
4 / 7
गूळ ज्या प्रमाणात घेतला असेल त्याच्या तीन पट स्वयंपाक घरात तयार झालेला ओला कचरा घ्या. त्याचे बारीक बारीक तुकडे करा किंवा मग मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करून घ्या. बाटलीमध्ये सगळ्यात खाली हा ओला कचरा टाका आणि त्यावर गूळ टाका.
5 / 7
जेवढा गूळ घेतला असेल त्याच्या दहापट पाणी टाका आणि बाटलीचेे झाकण लावून ती साधारण दिड दोन महिने तशीच राहू द्या.
6 / 7
त्यानंतर बाटलीमध्ये रोपांसाठी अतिशय पोषक ठरणारं औषध तयार झालेलं असेल. बाटलीचं झाकण भरेल एवढंच औषध महिन्यातून एकदा प्रत्येक झाडाच्या मातीत टाकून द्या.
7 / 7
हा उपाय जर नियमितपणे केला तर तुमची बाग नेहमीच हिरवीगार राहील. कधीच कोणतं विकतचं खत देण्याची गरज पडणार नाही.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणी