कढीपत्त्याचं रोप वाढेल भराभर, पानंही होतील सुगंधी- फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2023 2:36 PM 1 / 9कोणत्याही पदार्थाला कढीपत्त्याच तडका दिला की तो पदार्थ कसा आणखी छान- चवदार, सुवासिक होतो... 2 / 9जेवणाला चांगला स्वाद आणण्याचं काम तर कढीपत्ता करतोच, पण त्वचेसाठी आणि केसांसाठीही अतिशय गुणकारी असतो.3 / 9त्यामुळे आपल्या घरातल्या छोट्याशा बागेत काहीजण आवर्जून कढीपत्त्याचं रोप लावताताच.4 / 9पण बऱ्याचदा रोप चांगलं फुलतच नाही. किंवा तो अगदी काडीसारखा नुसता उंच वाढतो. छान डेरेदार होऊन बहरत नाही. तुमच्याही रोपाचं असंच झालं असेल तर हे काही साधे- सोपे उपाय करून पाहा.5 / 9कढीपत्त्याच्य झाडाला भरपूर ऊन लागतं. त्यामुळे जिथे स्वच्छ सुर्यप्रकाश येईल आणि त्या रोपाला ५ ते ६ तास चांगलं ऊन मिळेल अशा ठिकाणीच ठेवा.6 / 9खूप जास्त पाणी नको. पण माती ओलसर राहील याची काळजी घ्यावी आणि नियमितपणे पाणी टाकावं.7 / 9पावसाळा आणि उन्हाळा या ऋतुंमध्ये कढीपत्त्याची चांगली वाढ होत असते. त्यामुळे त्याला या दोन ऋतुंमध्ये नियमितपणे खत द्यावं. हिवाळ्यात कढीपत्त्याची खूप वाढ होत नाही. 8 / 9कढीपत्त्याच्या रोपाची नियमितपणे छाटणी करावी. तसेच पिवळी पडलेली पाने लगेच काढून टाकावी. यामुळे चांगला बहरतो.9 / 9कढीपत्ता चांगला बहरण्यासाठी तो नेहमीच मोठ्या आकाराच्या कुंडीत लावावा. आणखी वाचा Subscribe to Notifications