कार्तिकी एकादशी : विठोबाला प्रिय असलेल्या तुळशीचे पाहा सुंदर प्रकार, प्रत्येक तुळस औषधी आणि बहुगुणी ! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 5:55 PM 1 / 7घरात इतर कोणती रोपं असो किंवा नसो, पण तुळशीचं रोप मात्र प्रत्येक घरात हमखास असतंच. या बहुगुणी तुळशीचे जसे खूप फायदे आहेत, तसेच तिचे प्रकारही वेगवेगळे आहेत. बघा तुम्हाला यापैकी किती प्रकार माहिती आहेत..2 / 7बहुसंख्य लोकांना माहिती असणारा तुळशीचा एक प्रकार म्हणजे राम तुळस. राम तुळशीचे पानं हिरवेगार असतात. शिवाय तिची वाढही खूप जलद होते. राम तुळस सर्दी, खोकला, थंडी वाजून येणे, कफ मोकळा करणे, गॅसेस या त्रासांवर गुणकारी ठरते.3 / 7तुळशीचा लोकप्रिय असणारा दुसरा प्रकार म्हणजे कृष्ण तुळस. कृष्ण तुळशीच्या पानांवर जांभळट रंगाची छटा असते. ही तुळस रक्तदाब, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक उपयोगी ठरते. बॅक्टेरियल इन्फेक्शन, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठी कृष्ण तुळस फायदेशीर आहे.4 / 7कृष्ण तुळशीप्रमाणेच राधा तुळसही असते. जांभळट आणि हिरवट अशी दोन्ही पानं या तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात असतात. या तुळशीच्या पानांमधून चांगल्या प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात. तसेच सर्दी, खोकला, ताण कमी करण्यासाठी ती उपयोगी ठरते.5 / 7वन तुळस किंवा जंगली तुळस हा प्रकार तुळशीच्या सगळ्या प्रकारांपेक्षा अधिक औषधी असल्याचं मानलं जातं. पण राम तुळस, कृष्ण तुळस जशी सगळीकडे दिसून येते, तशी वन तुळस सर्वत्र आढळत नाही. 6 / 7अमृता तुळस ही इतर प्रकारांपेक्षा जास्त खुरटी असते. ती मुळची इस्ट आफ्रिकेतली असल्याचं मानलं जातं. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, झिंक, लोह तिच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. 7 / 7मिंट तुळस हा देखील तुळशीचा एक प्रकार बऱ्याच ठिकाणी आढळतो. बऱ्याच औषधींमध्ये, लेपांमध्ये मिंट तुळशीचा वापर केला जातो. खोकला, सर्दी, डोकेदुखी आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरते. तसेच नॅचरल डिटॉक्सिफायर म्हणून मिंट तुळस ओळखली जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications