छोट्याशा कुंडीत लावावीत अशी फुलझाडं, फारशी देखभाल न घेताही ८ फुलझाडं येतील बहरुन...

Updated:January 27, 2025 17:18 IST2025-01-27T17:06:21+5:302025-01-27T17:18:26+5:30

Low Maintenance Permanent flowering plants for every garden : Beautiful flowering plants that can grow without maintenance : Low maintenance balcony garden plants : What are some low maintenance flowers plants : फारशी काळजी घेतली नाही तरीही रोप फुलांनी गच्च भरुन जातात, अशी फुलझाडं...

छोट्याशा कुंडीत लावावीत अशी फुलझाडं, फारशी देखभाल न घेताही ८ फुलझाडं येतील बहरुन...

घरच्या गार्डनमध्ये किंवा लहानशा कुंडीत फुलझाडं लावायची (Low Maintenance Permanent flowering plants for every garden ) म्हणजे मोठे कठीण काम. काहीजणांना फुलझाडं लावायची म्हटलं की अवघड वाटते. फुलझाडांची तसेच त्यावर उमलणाऱ्या नाजूक फुलांची अधिकाधिक काळजी घ्यावी लागते असा काहीजणांचा समज असतो. फुलझाडांची होणारी वाढ, त्यावर उमलणारी फुल तसेच त्यांचे खतपाणी अशा इतर गोष्टींकडे अतिशय बारकाईने लक्ष द्यावे लागते.

छोट्याशा कुंडीत लावावीत अशी फुलझाडं, फारशी देखभाल न घेताही ८ फुलझाडं येतील बहरुन...

यासाठीच, आपल्यापैकी बरेचजण गार्डनमध्ये फुलझाडं फारच (Beautiful flowering plants that can grow without maintenance ) कमी प्रमाणांत लावतात. परंतु हा गैरसमज असून अशी काही फुलझाडं आहेत ज्यांची फारशी काळजी घेतली नाही किंवा पुरेसे लक्ष दिले नाही तरीही त्यांची व्यवस्थित वाढ होऊन रोपं अक्षरशः फुलांनी बहरुन येते. अशी कोणती फुलझाडं आहे ज्यांची फारशी काळजी घेतली नाही तरीही रोपांना छान, सुंदर, आकर्षक फुलं येतात ते पाहूयात.

छोट्याशा कुंडीत लावावीत अशी फुलझाडं, फारशी देखभाल न घेताही ८ फुलझाडं येतील बहरुन...

गडद नारंगी, पिवळी झेंडूची फुलं खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात. झेंडूच्या फुलांच्या रोपाची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. कमी पाण्यांतही हे फुलझाडं फुलांनी बहरुन येत. जानेवारी महिन्याच्या शेवट किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला या फुलझाडाची लागवड करण्यासाठी सगळ्यात उत्तम काळ असतो.

छोट्याशा कुंडीत लावावीत अशी फुलझाडं, फारशी देखभाल न घेताही ८ फुलझाडं येतील बहरुन...

गुलाबाचे फुल हे सगळ्यांच्याच गार्डनमध्ये असतेच. गुलाबाच्या रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश आणि पाणी एवढ्या दोनच गोष्टींची गरज असते. या रोपाची फारशी काळजी न घेताही हे रोपं फुलांनी बहरुन येते.

छोट्याशा कुंडीत लावावीत अशी फुलझाडं, फारशी देखभाल न घेताही ८ फुलझाडं येतील बहरुन...

जांभळ्या - पिवळ्या रंगाच्या पेटुनिया फुलांच्या रोपांची विशेष काळजी घेतली नाही तरीही या रोपाची चांगली वाढ होऊन फुल येतात.

छोट्याशा कुंडीत लावावीत अशी फुलझाडं, फारशी देखभाल न घेताही ८ फुलझाडं येतील बहरुन...

चमेलीची सुगंधीत फुल गार्डनमध्ये शोभून दिसतात. चमेलीच्या रोपाची विशेष काळजी न घेता देखील हे रोपं भराभर वाढते.

छोट्याशा कुंडीत लावावीत अशी फुलझाडं, फारशी देखभाल न घेताही ८ फुलझाडं येतील बहरुन...

सूर्यफूलाचे रोप विशेष काळजी किंवा फारसे लक्ष न देता देखील पटकन वाढते. या रोपाला फक्त सूर्यप्रकाशाची गरज असते. सूर्यफूल सूर्यप्रकाशाच्या दिशेनेच वाढतात. या रोपाला जास्त पाणी व खताची आवश्यकता नसते.

छोट्याशा कुंडीत लावावीत अशी फुलझाडं, फारशी देखभाल न घेताही ८ फुलझाडं येतील बहरुन...

लिलीच्या फुलांच्या रोपाची देखील फारशी काळजी घ्यावी लागत नाही. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण या रोपाची लागवड करु शकता. हा काळ या रोपांच्या वाढीसाठी अनुकूल असतो.

छोट्याशा कुंडीत लावावीत अशी फुलझाडं, फारशी देखभाल न घेताही ८ फुलझाडं येतील बहरुन...

स्नॅपड्रॅगनचे रंगीबेरंगी फुलझाड हिवाळ्यात अतिशय चांगल्या प्रकारे वाढते. या रोपाला फारशा देखभालीची गरज नसते.

छोट्याशा कुंडीत लावावीत अशी फुलझाडं, फारशी देखभाल न घेताही ८ फुलझाडं येतील बहरुन...

डेजीच्या फुलांचे रोप कोणत्याही प्रकारची विशेष काळजी न घेता देखील दीर्घकाळासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने वाढते.