तुम्हाला माहिती आहे एकूण किती प्रकारची तुळस असते? पाहा कोणती तुळस कशासाठी उपयोगी...

Updated:April 17, 2025 22:28 IST2025-04-17T20:18:50+5:302025-04-17T22:28:58+5:30

Plant These 7 Types Of Tulsi At Home You Not Take Medicine Many Diseases : Types of Tulsi and the best way to use them As a Medicine : Advantages of Tulsi Plants at Home : 7 Most Useful Health Benefits of Tulsi Plant : तुळशीच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार कोणकोणत्या आजरांवर ती गुणकारी ठरते ते पाहूयात...

तुम्हाला माहिती आहे एकूण किती प्रकारची तुळस असते? पाहा कोणती तुळस कशासाठी उपयोगी...

आपल्या सगळ्यांच्या घरात कायम एक छोटे तुळशीचे रोप (7 Most Useful Health Benefits of Tulsi Plant) असतेच. घरात तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे मानले जाते. भारतीय परंपरेमध्ये तुळशीचे अनेक फायदे सांगितले जातात.

तुम्हाला माहिती आहे एकूण किती प्रकारची तुळस असते? पाहा कोणती तुळस कशासाठी उपयोगी...

तुळशीच्या पानांत अनेक औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे वेगवेगळ्या (Plant These 7 Types Of Tulsi At Home You Not Take Medicine Many Diseases) आजारांवर घरगुती उपाय म्हणून तुळशीच्या पानांचा वापर फार ( Types of Tulsi and the best way to use them As a Medicine) पूर्वीपासून केला जातो. तुळशीचे देखील वेगवेगळे प्रकार असतात, तुळशीच्या या प्रकारांनुसार कोणकोणत्या आजरांवर ती गुणकारी ठरते ते पाहूयात.

तुम्हाला माहिती आहे एकूण किती प्रकारची तुळस असते? पाहा कोणती तुळस कशासाठी उपयोगी...

लिंबू तुळस ही आपल्या नेहमीच्या तुळशीपेक्षा संपूर्णपणे वेगळी असते. लिंबू तुळशीच्या पानांना लिंबासारखा सुगंध येतो म्ह्णूनच या तुळशीला 'लिंबू तुळस' असे म्हटले जाते. लिंबू तुळस जखम भरुन काढण्यास आणि शरीराला आलेली सूज कमी करण्यास फायदेशीर ठरते. ही तुळस स्वयंपाकासाठी आणि औषधी उपयोगसाठी जास्त प्रमाणांत वापरली जाते.

तुम्हाला माहिती आहे एकूण किती प्रकारची तुळस असते? पाहा कोणती तुळस कशासाठी उपयोगी...

कापूर तुळशीला निळी तुळस असे देखील म्हटले जाते. या तुळशीच्या पानांत भरपूर प्रमाणांत औषधी तेल असते. या तुळशीच्या पानांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. कापूर तुळस, चेहऱ्यावरील पिंपल्स, अ‍ॅक्ने, पुरळ, खाज, रॅशेज कमी करण्यास मदत करते. तसेच शरीराला येणारी सूज आणि वाढत्या वयानुसार त्वचेवर येणाऱ्या एजिंगच्या खुणा कमी करते.

तुम्हाला माहिती आहे एकूण किती प्रकारची तुळस असते? पाहा कोणती तुळस कशासाठी उपयोगी...

श्याम तुळशीला काळी तुळस असे देखील म्हटले जाते. श्याम तुळशीच्या पानांचे तेल अनेक त्वचा विकारांसाठी गुणकारी औषध म्हणून देखील वापरले जाते.

तुम्हाला माहिती आहे एकूण किती प्रकारची तुळस असते? पाहा कोणती तुळस कशासाठी उपयोगी...

बहुसंख्य लोकांना माहिती असणारा तुळशीचा एक प्रकार म्हणजे राम तुळस. राम तुळशीचे पानं हिरवेगार असतात. शिवाय तिची वाढही खूप जलद होते. राम तुळस सर्दी, खोकला, थंडी वाजून येणे, कफ मोकळा करणे, गॅसेस या त्रासांवर गुणकारी ठरते.

तुम्हाला माहिती आहे एकूण किती प्रकारची तुळस असते? पाहा कोणती तुळस कशासाठी उपयोगी...

कृष्ण तुळशीच्या पानांवर जांभळट रंगाची छटा असते. ही तुळस रक्तदाब, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक उपयोगी ठरते. बॅक्टेरियल इन्फेक्शन, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठी कृष्ण तुळस फायदेशीर आहे.

तुम्हाला माहिती आहे एकूण किती प्रकारची तुळस असते? पाहा कोणती तुळस कशासाठी उपयोगी...

कृष्ण तुळशीप्रमाणेच राधा तुळसही असते. जांभळट आणि हिरवट अशी दोन्ही पानं या तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात असतात. या तुळशीच्या पानांमधून चांगल्या प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात. तसेच सर्दी, खोकला, ताण कमी करण्यासाठी ती उपयोगी ठरते.

तुम्हाला माहिती आहे एकूण किती प्रकारची तुळस असते? पाहा कोणती तुळस कशासाठी उपयोगी...

मिंट तुळस हा देखील तुळशीचा एक प्रकार बऱ्याच ठिकाणी आढळतो. बऱ्याच औषधींमध्ये, लेपांमध्ये मिंट तुळशीचा वापर केला जातो. खोकला, सर्दी, डोकेदुखी आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरते. तसेच नॅचरल डिटॉक्सिफायर म्हणून मिंट तुळस ओळखली जाते.