भर उन्हाळ्यातही घर वाटेल थंड- हिरवंगार, 'हे' ५ इनडोअर प्लांट्स घरात ठेवा- घराचा लूक बदलेल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2024 11:52 AM 1 / 7आता काही दिवसांतच उकाडा खूप वाढणार आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा सुसह्य होण्यासाठी घरातही काही बदल करणं आवश्यक आहे. त्यातला सगळ्यात पहिला बदल म्हणजे घरात काही इनडोअर प्लांट्स आणून ठेवा.2 / 7झाडांच्या सावलीत आपल्याला शांत, थंड वाटते. एखाद्या हिरव्यागार झाडाकडे दुरून बघितलं तरी बरं वाटतं. म्हणूनच उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी अशीच टवटवीत हिरवीगार रोपं घरात आणून ठेवा. यामुळे घर फ्रेश तर राहीलच पण त्यांच्यामुळे घरही थंड वाटेल. 3 / 7 ज्या रोपाकडे पाहून नेहमीच प्रसन्न वाटतं असं रोप म्हणजे स्पायडर प्लांट. घरात किंवा घराबाहेर कुठेही ते छान वाढतात.4 / 7दुसरं म्हणजे मनीप्लांट. मनीप्लांटचं रोप घरात उंचावर ठेवलं आणि तिथून ते खाली सोडलं तरी त्या हिरव्यागार पानांकडे पाहून छान वाटेल.5 / 7हॉलमध्ये टिपॉयवर, खिडकीमध्ये, स्वयंपाक घरात असं कुठेही एखादं बांबू प्लांट नक्की ठेवा. ते देखील मनाला आणि डोळ्यांना खूप थंडावा देतं.6 / 7फॉक्स टेल देखील खूप छान वाढतं. लहान आकाराच्या कुंडीत लावलं तरी तिथल्या तिथे ते भरपूर फुलून येतं. फक्त हे रोप एक दिवस घरात ठेवलं तर दुसऱ्या दिवशी लगेचच कडक उन्हात ठेवा. कारण त्याला भरपूर उन्हाची गरज असते.7 / 7 अगदी लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत अनेक व्हरायटीमध्ये पाम मिळतो. तुमच्या घरात किती जागा आहे त्यानुसार अगदी टिपॉयवर ठेवण्यापासून ते एखाद्या कोपऱ्यात मोठं वाढू देण्यापर्यंत कोणत्याही आकाराचं पाम तुम्ही खरेदी करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications