नियमित पाणी घातलं, खतही घातलं तरी गुलाबाला फुलंच नाहीत? १ सिक्रेट, फुलांनी वाकेल झाड By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 4:13 PM 1 / 7गुलाबाचं फुल अनेकांचे फेव्हरिट असते. लग्न असो किंवा कोणताही खास प्रसंग, गुलाबाला नेहमीच मागणी असते. हिवाळ्याच्या दिवसांत गुलाबाचे रोप विकत घेऊन तुम्ही गार्डनमध्ये लावू शकता. गुलाब हिवाळ्यात भरपूर वाढतो पण वर्षभर गुलाब चांगलं राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (Tips And Tricks How To Maintain Rose Plant Care In All Weather)2 / 7गुलाबाचे रोप व्यवस्थित वाढावे यासाठी सुर्यप्रकाशाची काळजी घ्यावी. सगळ्यात आधी गुलाबाचे रोप थेट ऊन्हातून काढून कोणत्याही सावली असलेल्या ठिकाणी ठेवा. ज्यामुळे रोपाला पोषक वातावरण मिळेल.3 / 7गुलाबाच्या रोपाची पानं किवा एक्स्ट्रा फांद्या वेळच्यावेळी कापत राहा. पण पानं कापताना सावधगिरी बाळगा.4 / 7गुलाबाची रोपं उन्हाळ्यात पूर्णपणे आराम करत नाहीत. हिवाळ्यात फुलं आल्यानंतर काही काळ ब्रेक घेतात. यासाठी हिवाळ्याच्या दिवसांत रोपांना हेवी केमिकल्सयुक्त खत देणं टाळायला हवं.5 / 7गुलाबाच्या रोपाला किटकांचे जाळे लागणार नाही याची काळजी घ्या. जर दिसले तर त्वरीत दूर करा.6 / 7रोपाला पाणी देण्याची योग्य वेळ सकाळी किंवा संध्याकाळी असते. दुपारी पाणी देणं टाळा.7 / 7या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर गुलाबाचे रोप मस्त खुलेल आणि भरपूर फुलं येतील. आणखी वाचा Subscribe to Notifications