सापांना दूर ठेवणारी ५ रोपं, सापांचा धोका टाळायचा तर 'ही' झाडं अंगणात नक्की लावा... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2024 12:42 PM 1 / 7काही भागांमध्ये साप असण्याचं प्रमाण जास्त असतं. फ्लॅट संस्कृतीमध्ये तसा त्रास नसला तरी ज्यांच्याकडे घराभोवती मोकळी, ऐसपैस जागा आहे, अशा ठिकाणी अनेक जणांना साप येण्याचा धोका वाटतो.2 / 7म्हणूनच तुमच्याही भागात सापांचा धोका असेल तर त्यांना दूर ठेवणारी ही काही रोपं तुमच्या अंगणात, घरासमोरच्या बागेत नक्की लावा.3 / 7यापैकी सगळ्यात पहिलं आहे झेंडुचं रोप. झेंडूच्या वासाने साप त्या भागात फिरकत नाहीत.4 / 7स्नेक प्लांट पासूनही स्नेक म्हणजेच साप दूर राहतात. पण यासाठी स्नेक प्लांटची उंच वाढणारी व्हरायटी लावावी.5 / 7गवती चहाच्या वासानेही साप दूर राहतात. सापांपासून सुरक्षितताही मिळेल आणि गवती चहाचे आरोग्यदायी लाभही घेता येतील. 6 / 7घराभोवती लसूण जर लावला तर त्याच्या उग्र वासानेही साप घराच्या आसपास फिरकणार नाहीत. 7 / 7लसूणाप्रमाणेच कांद्याचा उपयोगही सापांना दूर ठेवण्यासाठी होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications