हँगिंग बास्केटमध्ये लावण्यासाठी ६ सदाबहार रोपं, बघा कसं सुंदर सजेल तुमचं टेरेस गार्डन By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2023 12:15 PM 1 / 8जागा कमी असेल तर हँगिंग बास्केटमध्ये रोपं लावून तुम्ही तुमची गार्डनिंगची हौस भागवू शकता. शिवाय वेगवेगळ्या फुलांनी- झाडांनी सजलेल्या हँगिंग बास्केटमुळे तुमच्या टेरेसचा किंवा गार्डनचा लूकही बदलून जातो.2 / 8आता असे कोणते हँगिंग प्लॅन्ट्स आपण टेरेसमध्ये, गॅलरीमध्ये लावू शकतो, ते पाहूया.. ही सगळीच रोपे अगदी सहज वाढतात. त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज पडत नाही. 3 / 8यापैकी सगळ्यात पहिलं आहे मनीप्लँट. मनीप्लँटचे वेगवेगळे प्रकार तुम्ही हँगिंग बास्केटमध्ये लावू शकता. गार्डनला वेगळा लूक येईल.4 / 8चिनी गुलाबही हँगिंग बास्केटमध्ये लावायला छान आहे. वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी तो बहरून गेल्यावर गार्डनला खूप छान लूक येईल.5 / 8तसंच ऑफिस टाईम या रोपट्याचंही आहे. वेगवेगळ्या रंगांची ऑफिस टाईमची रोपं आणूनही तुम्ही तुमचं छोटंसं हँगिंग गार्डन सजवू शकता. 6 / 8बोस्टन फर्न हे रोपही हँगिंग बास्केटमध्ये आपण लावतो तेव्हा चहुबाजुंनी छान फुलून येतं.7 / 8वंडरिंग ज्यू प्लॅन्ट्सचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. यातले सगळेच प्रकार किंवा तुम्हाला आवडणारा एकच प्रकार लावूनही तुम्ही टेरेस सजवू शकता. 8 / 8स्पायडर प्लान्टही लटकणाऱ्या कुंड्यांमध्ये छान दिसतं. आणखी वाचा Subscribe to Notifications