रोपांना द्या बटाट्याच्या सालींचं सुपरफूड, बघा कसा करायचा वापर- रोपांची होईल भरघोस वाढ By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2024 3:09 PM 1 / 5बागेतल्या रोपांची चांगली वाढ होत नसेल किंवा झाडांना फुलं येत नसतील तर बटाट्याच्या सालींचा हा उपयोग करून पाहा. उन्हाळ्यात झाडं हिरवीगार ठेवण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. 2 / 5बटाट्याच्या साली झाडांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. त्या रोपांसाठी एक प्रकारचं सुपरफूड आहेत. त्यामुळे त्या साली कधीही टाकून देऊ नका. एका खास पद्धतीने त्यांचा रोपांसाठी वापर करा.3 / 5बटाट्याच्या साली एका भांड्यात टाका. एका बटाट्याच्या सालींसाठी अर्धा लीटर पाणी वापरा. त्यामध्ये काही थेंब व्हाईट व्हिनेगर टाका आणि भांड्यावर झाकण ठेवून दोन दिवस ते फर्मेंट होऊ द्या. त्यानंतर हे पाणी झाडांना दे.4 / 5बटाट्याच्या सालींमध्ये काही ॲसिडीक पदार्थ असतात. हे पदार्थ मुळांची चांगली वाढ होऊन ते मजबूत होण्यासाठी उपयुक्त ठरतात. 5 / 5तसेच या उपायामुळे झाडांना भरपूर प्रमाणात पोटॅशियम, नायट्रोजन आणि फॉस्फेट मिळतं. ते झाडांची भरभरून वाढ होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. आणखी वाचा Subscribe to Notifications