अत्यंत बोल्ड मॅटर्निटी फोटो शूट करणाऱ्या १० बॉलिवूड अभिनेत्री, गरोदरपण त्यांनी अभिमानानं मिरवलं.. Published:January 2, 2023 02:53 PM 2023-01-02T14:53:27+5:30 2023-01-02T15:27:06+5:30
Top 10 Bollywood Actress & Their Stunning Maternity Photoshoots : आजकाल आपण बॉलिवूडमधील कित्येकी अभिनेत्रींना बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट करताना पाहिले आहे. कुणीतरी येणार... येणार गं... पाहुणा घरी येणार गं... असं म्हणत आपण घरी येणाऱ्या चिमुकल्या जीवाचे स्वागत करायला सज्ज असतो. हल्ली प्रत्येकाला गरोदरपणाले सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करायचे असतात. आपण सगळ्यांनी प्री - वेडिंग फोटोशूट ऐकलं असेल पण आता प्रेग्नन्सी दरम्यान डोहाळजेवण, ओटभरणी यांसारख्या कार्यक्रमांसोबतच मॅटर्निटी फोटोशुट करण्याचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. पूर्वीच्या काळी महिलांना प्रेग्नन्सी दरम्यान इतके सगळे सोहळे करण्याची मुभा नव्हती. परंतु बदलत्या जीवनशैलीनुसार मॅटर्निटी फोटोशूटच फॅड पसरत जात आहे. आजकाल आपण बॉलिवूडमधील कित्येकी अभिनेत्रींना बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट करताना पाहिले आहे. या ९ महिन्यात महिलेच्या शरीरात होणाऱ्या बदलांना सकारात्मकतेने स्वीकारून प्रोत्साहित करण्यासाठी आणि पालकत्व स्वीकारण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री हे मॅटर्निटी फोटोशूट करतात. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आजवर बोल्ड मॅटर्निटी शूट केले आहे. त्यापैकीच काहींचे हे सुंदर फोटो(Top 10 Bollywood Actress & Their Stunning Maternity Photoshoots).
बिपाशा बासू -
बिपाशा बासूने अतिशय बोल्ड मॅटर्निटी लूक केला होता. बिपाशाने गोल्डन स्ट्रपलेस गाऊनमध्ये बसलेला फोटो शेअर केलाय. या फोटोत ती आपले बेबी बंप दाखवत आहे. ग्लॉसी मेकअपसह बिपाशाने कानात मोठे इअरिंग घातले आहेत. बिपाशाचा अतिशय स्टनिंग आणि क्लासी लूक पाहायला मिळतोय.
करीना कपूर खान -
करीना कपूर खान हीने मुलगा जेहच्या वेळी मॅटर्निटी फोटोशूट केले होते. तिने तिच्या इंस्टाग्रामवर प्युमा (Puma) स्पोर्ट्स ब्रँडसोबतचे मॅटर्निटी फोटोशूट शेअर केले.
अनुष्का शर्मा -
अनुष्का शर्माने वोग मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी मॅटर्निटी फोटोशूट केलं. या फोटोंत अनुष्का शर्मा अतिशय सुंदर दिसत आहे. अनुष्काने आपल्या मॅटर्निटी फोटोशूटसाठी फ्रिल ड्रेसपासून ते अगदी आरामदायक डंगरीपर्यंत एकापेक्षा एक सुंदर फॅशनेबल मॅटर्निटी ड्रेस निवडले होते.
लिसा हेडन -
अभिनेत्री लिसा हेडनने अतिशय स्टायलिश पद्धतीने बेबी बंप फ्लाँट केल्याचे आपण पाहू शकता. विशेष म्हणजे या फोटोशूटसाठी तिनं केवळ स्टायलिशच नव्हे तर कम्फर्टेबल ड्रेसचीही निवड केली होती. या फोटोमध्ये लिसाने हिरव्या रंगाचे आउटफिट परिधान केल्याचे पाहू शकता. ड्रेसधील स्वीटहार्ट नेकलाइनसह ब्रॉड कट शोल्डर डिझाइनमुळे अभिनेत्रीला आकर्षक लुक मिळाला आहे. फुल स्लीव्ह्ज आणि गुडघ्यापर्यंत लांब असणाऱ्या या ड्रेसमध्ये लिसा प्रचंड सुंदर दिसतेय.
सोनम कपूर -
सोनम कपूर हिने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटसाठी ऑफ व्हाइट रंगाच्या ग्लॅमरस ड्रेसची निवड केली होती. आपल्या ३७ व्या वाढदिवशी तिने हे मॅटर्निटी फोटोशूट केले होते.
आलिया भट -
सिंगापूरमध्ये झालेल्या टाइम्स १०० इम्पॅक्ट या अवॉर्ड फंक्शनमध्ये आलियाने शानदार आणि फ्लोई गाऊन परिधान केला होता. गाऊनला प्लंजिंग नेकलाइन आणि कॅप सारख्या स्लीव्स होत्या. विशेष म्हणजे तिने न्यूड मेकअप देखील केला होता.
नेहा धुपिया -
अभिनेत्री नेहा धुपियाने तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीच्यावेळी एका मॅगझीनसाठी खास मॅटर्निटी फोटोशूट केलं होत.यावेळी गर्भवती नेहा धुपियाचा ‘सुपर मॉडेल’ अवतार दिसला.
कल्की कोचलीन -
३५ वर्षांच्या कल्की कोचलीनने एका मॅगझीनसाठी खास मॅटर्निटी फोटोशूट करताना बेबी बंपसहित सुपर हॉट पोज दिल्या आहेत.
समीरा रेड्डी -
समीरा रेड्डीने प्रेग्नंन्सी दरम्यान अंडर वॉटर मॅटर्निटी फोटोशूट करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. याआधी बॉलिवूड मधील कोणत्याही अभिनेत्रीने असे अंडर वॉटर मॅटर्निटी फोटोशूट केले नव्हते. त्यामुळे समीरचे फोटो बघून अनेकांनी तिला ट्रोल केले तर काहींनी कौतुकही केले.
सोहा अली खान -
करीना कपूर मागोमाग तिची नणंद सोहा अली खान हिनेसुद्धा खूप सुंदर मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. या मॅटर्निटी फोटोशूट दरम्यान सोहाने फिकट पिंक रंगाचा शॉर्ट वन पीस परिधान केला आहे. त्यासोबतच तिच्या हातात दुधाच्या बाटलीच्या आकाराचा फुगा दिसत आहे. या फोटोमध्ये तिच्या ड्रेसला मॅचिंग असे बॅकग्राउंड आहे.