शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही, हे सांगणारी १० लक्षणं.. तुम्हालाही जाणवतात का आरोग्याच्या या तक्रारी?

Published:November 26, 2022 05:16 PM2022-11-26T17:16:38+5:302022-11-26T17:24:45+5:30

शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही, हे सांगणारी १० लक्षणं.. तुम्हालाही जाणवतात का आरोग्याच्या या तक्रारी?

१. जवळपास ७३ टक्के भारतीयांमध्ये प्रोटीन्सची कमतरता दिसून येते. शरीर बांधणीसाठी प्रोटीन हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पण नेमका तोच घटक आहारातून पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने अनेकांना आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी जाणवतात. तुम्हालाही पुढील लक्षणांपैकी काही त्रास वारंवार जाणवत असेल, तर प्रोटीन्सची कमतरता हे त्यामागचं एक कारण असू शकतं.

शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही, हे सांगणारी १० लक्षणं.. तुम्हालाही जाणवतात का आरोग्याच्या या तक्रारी?

२. सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा यांनी नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली असून त्यात त्यांनी शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे, हे कसं ओळखायचं याविषयी माहिती दिली आहे. त्यापैकी त्यांनी सांगितलेलं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं.

शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही, हे सांगणारी १० लक्षणं.. तुम्हालाही जाणवतात का आरोग्याच्या या तक्रारी?

३. केस खूप जास्त गळत असतील आणि उपचार करूनही काही फरक पडत नसेल तर प्रोटीन्सची कमतरता हे त्यामागचं कारण असू शकतं.

शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही, हे सांगणारी १० लक्षणं.. तुम्हालाही जाणवतात का आरोग्याच्या या तक्रारी?

४. कधी कधी येणारा अशक्तपणा समजण्यासारखा असतो. पण काही जणं नेहमीच थकलेले, निरुत्साही दिसतात. अशा लोकांनी एकदा प्रोटीन लेव्हल तपासून पहावी.

शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही, हे सांगणारी १० लक्षणं.. तुम्हालाही जाणवतात का आरोग्याच्या या तक्रारी?

५. सतत मूड बदलत राहणं, चिडचिडेपणा वाढलेला असणं, हेदेखील एक त्याचंच लक्षण आहे.

शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही, हे सांगणारी १० लक्षणं.. तुम्हालाही जाणवतात का आरोग्याच्या या तक्रारी?

६. प्रथिनांच्या कमतरतेमुळे सांधेदुखीचा त्रासही उद्भवू शकतो. किंवा ज्यांना तो त्रास आहेच, त्यांचा तो वाढू शकतो.

शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही, हे सांगणारी १० लक्षणं.. तुम्हालाही जाणवतात का आरोग्याच्या या तक्रारी?

७. काही कारण नसताना अचानक वजन वाढत असेल, तर एकदा प्रोटीन लेव्हल तपासून घ्या.

शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही, हे सांगणारी १० लक्षणं.. तुम्हालाही जाणवतात का आरोग्याच्या या तक्रारी?

८. शांत झोप न लागणं किंवा रात्री लवकर झोपच न येणं हे देखील एक त्याचं लक्षण आहे.

शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही, हे सांगणारी १० लक्षणं.. तुम्हालाही जाणवतात का आरोग्याच्या या तक्रारी?

९. प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचं प्रमाण वाढतं आणि खूपच कमी वयात चेहरा थकलेला, सुरकुतलेला दिसू लागतो.

शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही, हे सांगणारी १० लक्षणं.. तुम्हालाही जाणवतात का आरोग्याच्या या तक्रारी?

१०. सारखं गोड खावंसं वाटत असेल तर ते ही एक लक्षण असू शकतं.

शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही, हे सांगणारी १० लक्षणं.. तुम्हालाही जाणवतात का आरोग्याच्या या तक्रारी?

११. तसेच काही लक्षात राहत नाहीये, आपण चटकन विसरून जात आहोत, असं वाटल्यास एकदा प्रोटीन्सची पातळी तपासून पहा.