उपवास तर करता पण नंतर डोकं दुखतं, भयंकर ॲसिडीटी होते? ३ टिप्स- उपवास करा आनंदानं

Updated:February 25, 2025 20:34 IST2025-02-25T17:36:32+5:302025-02-25T20:34:16+5:30

उपवास तर करता पण नंतर डोकं दुखतं, भयंकर ॲसिडीटी होते? ३ टिप्स- उपवास करा आनंदानं

ज्या लोकांना नेहमी उपवास करण्याची सवय नसते त्यांना उपवास केल्यानंतर खूप त्रास होतो. दिवसभर उत्साह असतो, पण सायंकाळी डोकं दुखायला लागतं, ॲसिडीटी वाढल्यासारखी होते.(3 important diet tips to avoid acidity after Mahashivratri fast)

उपवास तर करता पण नंतर डोकं दुखतं, भयंकर ॲसिडीटी होते? ३ टिप्स- उपवास करा आनंदानं

काही जणांना तर उपवासानंतर ॲसिडीटीचा एवढा जास्त त्रास होतो की त्यांना दुसऱ्यादिवशी पण अस्वस्थ होतं, ॲसिडीटी कमी होत नाही. म्हणूनच अशा लोकांनी महाशिवरात्रीचा उपवास करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना उपवास अजिबात जड जाणार नाही आणि उपवासाचा काहीही त्रास होणार नाही.

उपवास तर करता पण नंतर डोकं दुखतं, भयंकर ॲसिडीटी होते? ३ टिप्स- उपवास करा आनंदानं

उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याविषयी माहिती देताना आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी सांगतात की उपवासाच्या दिवशी नेहमीपेक्षा थोडं जास्त प्रमाणात पाणी प्या. या दिवशी तेलकट, तुपकट खूप जास्त खाणं होतं. जड पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे पचन व्यवस्थित होण्यासाठी पाणी थोडं जास्त प्या.

उपवास तर करता पण नंतर डोकं दुखतं, भयंकर ॲसिडीटी होते? ३ टिप्स- उपवास करा आनंदानं

उपवास आहे म्हणून सकाळीच उपाशीपोटी फळं खाऊ नका. उपाशीपोटी फळं खाल्ल्याने ॲसिडीटी वाढते.

उपवास तर करता पण नंतर डोकं दुखतं, भयंकर ॲसिडीटी होते? ३ टिप्स- उपवास करा आनंदानं

उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे असे पदार्थ खाणार असाल तर त्याच्यासोबत ताक नक्की प्या. ताक प्यायल्याने जड साबुदाणा पचायला सोपा जातो आणि त्रास होत नाही.