जोर लावूनही पोट साफ होतच नाही? ३ पद्धतींनी शरीराची हालचाल करा-कॉन्स्टिपेशन होणार नाही

Published:October 3, 2024 09:05 AM2024-10-03T09:05:09+5:302024-10-03T16:10:04+5:30

जोर लावूनही पोट साफ होतच नाही? ३ पद्धतींनी शरीराची हालचाल करा-कॉन्स्टिपेशन होणार नाही

बऱ्याच जणांना शौचास साफ होण्यास खूप त्रास होतो. पोट लवकर साफ होत नाही. रोजच सकाळी उठून जोर द्यावा लागतो. तरीही पोट स्वच्छ होत नाही. (3 best remedies for constipation)

जोर लावूनही पोट साफ होतच नाही? ३ पद्धतींनी शरीराची हालचाल करा-कॉन्स्टिपेशन होणार नाही

तुम्हालाही असाच कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर सकाळी उठल्यानंतर काही वेळासाठी शरीराच्या काही विशिष्ट हालचाली करा. यामुळे आतड्यांचे स्नायू, पोटाचे स्नायू मोकळे होऊन पोट साफ होण्यास मदत होईल. (how to get rid of constipation?)

जोर लावूनही पोट साफ होतच नाही? ३ पद्धतींनी शरीराची हालचाल करा-कॉन्स्टिपेशन होणार नाही

ते व्यायाम नेमके कोणते याविषयीची माहिती सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली.

जोर लावूनही पोट साफ होतच नाही? ३ पद्धतींनी शरीराची हालचाल करा-कॉन्स्टिपेशन होणार नाही

त्यांनी सांगितलेला पहिला व्यायाम आहे मलासन. काही सेकंदासाठी मलासन करा आणि त्यामध्ये १ ते ३ मिनिटे चाला.

जोर लावूनही पोट साफ होतच नाही? ३ पद्धतींनी शरीराची हालचाल करा-कॉन्स्टिपेशन होणार नाही

त्यानंतर दुसरा व्यायाम आहे उदराकर्षणासन. हा व्यायाम करण्यासाठी मलासनात बसा. त्यानंतर उजव्या पायाचा गुडघा वाकवून डाव्या तळपायाजवळ ठेवा. नंतर डावा गुडघा वाकवून उजव्या तळपायाजवळ ठेवा. १ ते ३ मिनिटांसाठी अशा पद्धतीने शारीरिक हालचाल करा.

जोर लावूनही पोट साफ होतच नाही? ३ पद्धतींनी शरीराची हालचाल करा-कॉन्स्टिपेशन होणार नाही

तिसरी हालचाल म्हणजे पवनमुक्तासन ते भद्रासन अशी हालचाल करणे. सुरुवातीला पवनमुक्तासन करा आणि त्यानंतर उठून लगेच भद्रासन करा. पुन्हा भद्रासनातून पवनमुक्तासन करा. असं साधारण १० ते १२ वेळा करा.

जोर लावूनही पोट साफ होतच नाही? ३ पद्धतींनी शरीराची हालचाल करा-कॉन्स्टिपेशन होणार नाही

हे ३ व्यायाम किंवा शारिरीक हालचाली केल्यानंतर पोट साफ होण्यास नक्कीच मदत होईल, असं अंशुका परवानी सांगतात.