दूरचं धुसर दिसतं? योगशास्त्रात सांगितलेल्या ४ सोप्या गोष्टी करून पाहा, नजर होईल तेज

Updated:February 2, 2025 09:10 IST2025-02-02T09:05:46+5:302025-02-02T09:10:01+5:30

दूरचं धुसर दिसतं? योगशास्त्रात सांगितलेल्या ४ सोप्या गोष्टी करून पाहा, नजर होईल तेज

स्क्रिन टाईम वाढल्यामुळे सध्या अनेकांना कमी वयातच चष्मा लागत आहे. दुरचं धुसर झाल्यासारखं दिसतं. अशावेळी सगळ्यात आधी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले. पण त्यासोबतच योगशास्त्रात सांगितलेले हे काही उपायही तुम्ही करून पाहू शकता.

दूरचं धुसर दिसतं? योगशास्त्रात सांगितलेल्या ४ सोप्या गोष्टी करून पाहा, नजर होईल तेज

सगळ्यात पहिला उपाय म्हणजे दोन्ही तळहात एकमेकांवर उबदार होईपर्यंत घासा. हात उबदार झाले की ते अलगदपणे तुमच्या डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांना तळहातांची उब जाणवू द्या पण दाब देऊ नका. या अवस्थेत एखादा मिनिट बसा आणि दिर्घ श्वसन करा. दिवसातून २- ३ वेळा हा उपाय करू शकता.

दूरचं धुसर दिसतं? योगशास्त्रात सांगितलेल्या ४ सोप्या गोष्टी करून पाहा, नजर होईल तेज

डोळ्यांचे व्यायाम करा. डोळे हळूवारपणे क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने फिरवा. त्यानंतर एखाद्या दुरच्या वस्तूवर नजर स्थिर करा, त्यानंतर एखाद्या जवळच्या वस्तूवर नजर स्थिर करा.

दूरचं धुसर दिसतं? योगशास्त्रात सांगितलेल्या ४ सोप्या गोष्टी करून पाहा, नजर होईल तेज

स्क्रिनवर काम करताना अनेक जण डोळ्यांची खूपच कमी वेळा उघडझाप करतात. तुमचंही तसंच होत असेल मधून मधून ब्रेक घेऊन डोळ्यांची काही सेकंदासाठी उघडझाप करा. यामुळे डोळे ओलसर राहण्यास मदत होते.

दूरचं धुसर दिसतं? योगशास्त्रात सांगितलेल्या ४ सोप्या गोष्टी करून पाहा, नजर होईल तेज

त्राटक केल्यानेही नजर चांगली राहण्यास मदत होते. एखाद्या योगतज्ज्ञाकडून त्राटक व्यवस्थित शिकून घ्या आणि ते नियमितपणे करा.