कोलेस्टेरॉल एवढंच घातक असतं शरीरातलं ट्रायग्लिसराईड वाढणं, डॉक्टर सांगतात ते नियंत्रित ठेवायचं तर....

Updated:March 22, 2025 16:36 IST2025-03-22T16:30:05+5:302025-03-22T16:36:48+5:30

कोलेस्टेरॉल एवढंच घातक असतं शरीरातलं ट्रायग्लिसराईड वाढणं, डॉक्टर सांगतात ते नियंत्रित ठेवायचं तर....

कोलेस्टेरॉलबाबत आता बऱ्याच प्रमाणात लोक जागरुक झालेले आहेत. पण त्याच्या एवढंच घातक ठरू शकणारं ट्रायग्लिसराईडही नियंत्रित असायला हवं यासाठी खूपच कमी लोक प्रयत्न करताना दिसतात.(how to control triglyceride level?)

कोलेस्टेरॉल एवढंच घातक असतं शरीरातलं ट्रायग्लिसराईड वाढणं, डॉक्टर सांगतात ते नियंत्रित ठेवायचं तर....

शरीरातलं ट्रायग्लिसराईड वाढलं तर रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढत जातो (4 causes of high triglycerides). म्हणूनच डॉ. सलीम जैदी यांनी याविषयी माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून यांनी ट्रायग्लिसराईड नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे, याविषयीची माहिती दिली आहे.(best way to control triglyceride level)

कोलेस्टेरॉल एवढंच घातक असतं शरीरातलं ट्रायग्लिसराईड वाढणं, डॉक्टर सांगतात ते नियंत्रित ठेवायचं तर....

डॉक्टर सांगतात की तुमच्या आहारात साखरेचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला मधुमेह होण्याप्रमाणेच शरीरातील ट्रायग्लिसराईड वाढण्याचा धोकाही असतो. त्यामुळे गोड पदार्थ, कोल्ड्रिंग, पॅकेज फूड यांपासून शक्य तितकं लांब राहा.

कोलेस्टेरॉल एवढंच घातक असतं शरीरातलं ट्रायग्लिसराईड वाढणं, डॉक्टर सांगतात ते नियंत्रित ठेवायचं तर....

तळलेले पदार्थ तसेच जंक फूड खाण्याचं प्रमाण कमी करा. कारण त्यामुळेही शरीरातले ट्रायग्लिसराईड वाढू शकते.

कोलेस्टेरॉल एवढंच घातक असतं शरीरातलं ट्रायग्लिसराईड वाढणं, डॉक्टर सांगतात ते नियंत्रित ठेवायचं तर....

जा लोकांना अल्कोहोल जास्त प्रमाणात घेण्याची सवय असते त्या लोकांच्या लिव्हरवर परिणाम होतो आणि लिव्हर खराब झाल्यामुळे त्यांच्या शरीरातले ट्रायग्लिसराईड वाढू शकते.

कोलेस्टेरॉल एवढंच घातक असतं शरीरातलं ट्रायग्लिसराईड वाढणं, डॉक्टर सांगतात ते नियंत्रित ठेवायचं तर....

ज्या लोकांच्या शारीरिक हालचाली खूपच कमी असतात त्या लोकांनाही ट्रायग्लिसराईड वाढण्याचा धोका असतो.

कोलेस्टेरॉल एवढंच घातक असतं शरीरातलं ट्रायग्लिसराईड वाढणं, डॉक्टर सांगतात ते नियंत्रित ठेवायचं तर....

ट्रायग्लिसराईड नियंत्रित ठेवण्यासाठी नियमितपणे फळं, भाज्या, ओट्स, अक्रोड यासारखे पदार्थ खावेत. तसेच दररोज ३० मिनिटे तरी कोणता ना कोणता व्यायाम करावा.