तब्येतीच्या ‘या’ ४ तक्रारी असतील तर आंघोळ करणं टाळा, तब्येतीसाठी ते घातक-पाहा कारण.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 5:12 PM 1 / 7आंघोळ करणं हे अगदी रोजचं काम आणि ते झालंच पाहिजे. स्वच्छतेसाठी तर आपण आंघोळ करतोच, पण आंघोळ करण्याचेही इतर अनेक फायदे आहेत.2 / 7नियमितपणे आंघोळ केल्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच वात, पित्त, कफ या तिन्ही प्रकृती संतुलित राहण्यास मदत होते. आंघोळ करण्याचे असे फायदे असले तरी तब्येतीच्या कोणत्या तक्रारी असतील तर आंघोळ करणं टाळलं पाहिजे, याची माहिती आयुर्वेद तज्ज्ञांनी दिली आहे.3 / 7सर्वसामान्यपणे खूप जास्त सर्दी असल्यावर किंवा ताप आल्यावर आपण आंघोळ करत नाही. पण या व्यतिरिक्त अन्य दुखण्यांमध्येही आंघोळ करणं टाळावं, असं आयुर्वेद तज्ज्ञांनी chitchatrajlavi and rajeshwarisachdev या इन्स्टाग्राम पेजवर सुचवलं आहे. 4 / 7त्यानुसार जर जुलाब होत असतील, तर आंघोळ करू नये.5 / 7कान दुखत असेल तरीही आंघोळ करणं टाळावं.6 / 7जेवल्यानंतर लगेचच आंघोळ करू नये. 7 / 7तसेच गॅसेसचा त्रास खूप जास्त होत असेल, तरीही अशा केसमध्ये आंघोळ करणं टाळायला पाहिजे, असं आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात. आणखी वाचा Subscribe to Notifications