गरम पाणी पिऊनही पोट साफ होत नाही? ४ साध्या सोप्या टिप्स- ५ मिनिटांतच पोट साफ होईल
Updated:February 11, 2025 09:25 IST2025-02-11T09:22:57+5:302025-02-11T09:25:02+5:30

काही जणांना पोट साफ होण्यात नेहमीच खूप अडचणी येतात. कॉन्स्टीपेशनचा खूप त्रास होतो.(4 simple tips and tricks to get rid of constipation)
अगदी गरम पाणी पिऊनही पोट साफ होत नाही. तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर तो त्रास कमी करून अगदी झटपट पोट मोकळं होण्यासाठी हे काही उपाय करून पाहा..(how to get rid of constipation?)
तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ वाढवा. फायबर असणारे पदार्थ जास्तीतजास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनक्रिया अधिक चांगली होते आणि पोट लवकर साफ होतं.
तुम्ही जर पुरेशा प्रमाणात पाणी पित नसाल तरीही पोट साफ व्हायला त्रास होतो. त्यामुळे दिवसातून ८ ग्लास पाणी तरी प्यायलाच हवं. यामुळे पचनक्रियेसाठी मदत होते. शिवाय शरीरही उत्तम पद्धतीने हायड्रेटेड राहाते.
नियमितपणे काही ना काही व्यायाम करा. नियमितपणे व्यायाम केल्यास आतड्यांच्या स्नायूंचाही व्यायाम होतो आणि पचनक्रिया अधिक चांगली होते.