हार्मोनल बॅलन्स बिघडला हे सांगणारी ४ लक्षणं! किरकोळ म्हणून दुर्लक्ष म्हणजे मोठ्या आजाराला आमंत्रणच..
Updated:February 19, 2025 16:34 IST2025-02-19T13:31:26+5:302025-02-19T16:34:28+5:30

आपल्या शरीरात हार्मोन्स एखाद्या मेसेंजरप्रमाणे काम करत असतात. शरीरात स्त्रवणारे हे घटक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करतात. त्यातल्या एकाही हार्मोन्सचे प्रमाण कमी- अधिक होऊन चालत नाही.(4 symptoms that shows hormonal imbalance in your body)
शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडले की त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर दिसून येतो. पण त्याची काही लक्षणं दिसत असूनही आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे मग तब्येत बिघडत जाते. म्हणूनच हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे दिसून येणाऱ्या या लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका.(how to identify hormonal imbalance in your body?)
ती लक्षणं नेमकी कोणती याविषयीची माहिती डॉक्टरांनी drdixa_healingsouls या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. त्यापैकी पहिलं लक्षण आहे चेहऱ्यावर अचानकच ॲक्ने, पिगमेंटेशन होणे. चेहऱ्यावरचे केस वाढणे, त्वचा खूप कोरडी पडणे, त्वचेला खाज येणे.
दुसरं लक्षण म्हणजे नेहमीच पोट फुगल्यासारखं वाटणे, ॲसिडीटी, अपचन, कॉन्स्टीपेशन असा त्रास वारंवार होणे.
मासिक पाळी अनियमित होणे. किंवा मासिक पाळी वेळेवर आली तर नेहमीपेक्षा खूप जास्त किंवा खूप कमी रक्तस्त्राव होणे. गर्भधारणा होण्यास अडचणी येणे..
झोपेचे चक्र बिघडून जाणे. रात्री शांत झोप न होणे किंवा अंथरुणावर पडून राहिलं तरी बराच वेळ झोप न येणे. दिवसभर थकवा, अस्वस्थपणा जाणवून आळस येणे.
अचानकपणे खूप जास्त वजन वाढणे किंवा मग वजन खूप कमी होणे.