अंथरुणावर पडल्या पडल्या ढाराढूर झोपाल; १ इफेक्टीव्ह उपाय, रात्रभर तळमळत राहावं लागणार नाही.. Published:April 3, 2023 12:10 PM 2023-04-03T12:10:28+5:30 2023-04-03T14:49:10+5:30
4 ways to fall asleep quickly and naturally : मॅग्नेशियमच्या कमतरतेसाठी ड्राय फ्रुट्सचे सेवनही तुम्ही करू शकता. बदाम, काजू, ब्राजिल नट्समध्ये याचे प्रमाण जास्त असते. ताणतणावामुळे रात्री शांत झोप लागणं सध्या खूपच कढीण झालंय. अनेकांना इंसोम्नियाचा सामना करावा लागत आहे. या आजारात व्यक्तीला शांत झोप येत नाही. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर करावे लागते. झोप न येण्याचं कारण ताण तणाव असू शकतं. (How to sleep get sleep faster)
न्युट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्यामते शरीरातील असंतुलनही या आजाराचं कारण ठरू शकतं. जर शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असेल तर झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. हा त्रास दूर करण्यासाठी एक्सपर्ट्सनी काही खास उपाय सांगितले आहेत. (Tips for Falling Asleep Fast)
रात्रीच्या जेवणात हा बदल करा
न्युट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्यामते शांत झोप येण्यासाठी आठवडाभर रात्रीच्या जेवणात बदल केल्यास पुरेपूर फायदा मिळेल. त तुम्ही कोडो मिलेट, रताळे खायला सुरूवात करा. कोडो मिलेट्समध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. तांदळाप्रमाणे हे शिजवले जाते. १०० ते १५० ग्राम रताळ्यांचे सेवन करा.
डार्क चॉकलेट
मॅग्नेशियमसाठी डार्क चॉकलेटचे सेवन करा. यात पोषक तत्वांचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय आयर्न, कॉपर, मॅन्गनीज, प्रिबायोटीक फायबर्ससुद्धा असतात. मात्र योग्य प्रमाणातच याचे सेवन करायला हवे.
ड्राय फ्रुट्स
मॅग्नेशियमच्या कमतरतेसाठी ड्राय फ्रुट्सचे सेवनही तुम्ही करू शकता. बदाम, काजू, ब्राजिल नट्समध्ये याचे प्रमाण जास्त असते. यातील हेल्दी फॅट्स कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
कोडो मिलेटप्रमाणे अन्य धान्यांमधूनही तुम्हाला भरभरून मॅग्नेशियम मिळेल. झोप येण्यासाठी गहू, ओट्स जवस, क्विनोआ यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
झोपण्याआधी जास्त पाणी प्यायल्याने रात्रीच्या वेळी वारंवार लघवी करण्यासाठी जावे लागते. ज्यामुळे आपल्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो. म्हणून झोपण्याआधी अतिप्रमाणात पाणी पिणं टाळा.