Join us   

अंथरुणावर पडल्या पडल्या ढाराढूर झोपाल; १ इफेक्टीव्ह उपाय, रात्रभर तळमळत राहावं लागणार नाही..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 12:10 PM

1 / 7
ताणतणावामुळे रात्री शांत झोप लागणं सध्या खूपच कढीण झालंय. अनेकांना इंसोम्नियाचा सामना करावा लागत आहे. या आजारात व्यक्तीला शांत झोप येत नाही. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर करावे लागते. झोप न येण्याचं कारण ताण तणाव असू शकतं. (How to sleep get sleep faster)
2 / 7
न्युट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्यामते शरीरातील असंतुलनही या आजाराचं कारण ठरू शकतं. जर शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असेल तर झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. हा त्रास दूर करण्यासाठी एक्सपर्ट्सनी काही खास उपाय सांगितले आहेत. (Tips for Falling Asleep Fast)
3 / 7
न्युट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्यामते शांत झोप येण्यासाठी आठवडाभर रात्रीच्या जेवणात बदल केल्यास पुरेपूर फायदा मिळेल. त तुम्ही कोडो मिलेट, रताळे खायला सुरूवात करा. कोडो मिलेट्समध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. तांदळाप्रमाणे हे शिजवले जाते. १०० ते १५० ग्राम रताळ्यांचे सेवन करा.
4 / 7
मॅग्नेशियमसाठी डार्क चॉकलेटचे सेवन करा. यात पोषक तत्वांचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय आयर्न, कॉपर, मॅन्गनीज, प्रिबायोटीक फायबर्ससुद्धा असतात. मात्र योग्य प्रमाणातच याचे सेवन करायला हवे.
5 / 7
मॅग्नेशियमच्या कमतरतेसाठी ड्राय फ्रुट्सचे सेवनही तुम्ही करू शकता. बदाम, काजू, ब्राजिल नट्समध्ये याचे प्रमाण जास्त असते. यातील हेल्दी फॅट्स कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
6 / 7
कोडो मिलेटप्रमाणे अन्य धान्यांमधूनही तुम्हाला भरभरून मॅग्नेशियम मिळेल. झोप येण्यासाठी गहू, ओट्स जवस, क्विनोआ यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
7 / 7
झोपण्याआधी जास्त पाणी प्यायल्याने रात्रीच्या वेळी वारंवार लघवी करण्यासाठी जावे लागते. ज्यामुळे आपल्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो. म्हणून झोपण्याआधी अतिप्रमाणात पाणी पिणं टाळा.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल