Join us   

दिवसाची सुरुवात १ ग्लास पाणी पिऊन करा- ॲसिडीटी, किडनीस्टोनचा त्रास कमी करण्यासह ५ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 4:08 PM

1 / 6
दिवसाची सुरुवात १ ग्लास पाणी पिऊन करणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. यामुळे तुमची लहान-सहान दुखणी तर कमी होतीलच पण आरोग्याच्या काही मोठ्या समस्या कमी होण्यासही नक्कीच मदत होईल, असं तज्ज्ञ सांगतात.
2 / 6
मेडीसिन नेट यांच्या रिपोर्टनुसार आपण रात्रीचे ७ ते ८ तास काही खाल्लेले, प्यायलेले नसते. त्यामुळे शरीर काही प्रमाणात डिहायड्रेट होण्यास सुरुवात होते. ते रोखण्यासाठी आणि शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी सकाळी सगळ्यात आधी पाणी पिणे गरजेचे आहे. थंड पाणी पिण्यापेक्षा कोमट पाणी पिणे अधिक चांगले.
3 / 6
ग्लासभर पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केल्यास चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे पचन चांगले होऊन वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. बॉडी डिटॉक्स करण्याची ही एक सगळ्यात सोपी नैसर्गिक पद्धत आहे, असं म्हटलं जातं.
4 / 6
किडनी स्टोनचा त्रास कमी करण्यासाठीही दररोज सकाळी १ ग्लास पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते.
5 / 6
वारंवार ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर या उपायाने तो नक्कीच कमी होऊ शकतो.
6 / 6
कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रोज सकाळी नेमाने १ ग्लास कोमट पाणी प्या. पोट लवकर साफ होईल.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सपाणीवेट लॉस टिप्स