हृदय कायम ठणठणीत ठेवणारे ५ पदार्थ, बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी आणि वजनही राहील नियंत्रणात

Updated:February 15, 2025 14:02 IST2025-02-15T09:21:06+5:302025-02-15T14:02:09+5:30

हृदय कायम ठणठणीत ठेवणारे ५ पदार्थ, बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी आणि वजनही राहील नियंत्रणात

शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयाचं आरोग्य जपणारे हे काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असणं खूप गरजेचं आहे.

हृदय कायम ठणठणीत ठेवणारे ५ पदार्थ, बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी आणि वजनही राहील नियंत्रणात

ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉक्टरांनी dr.rohit.sane या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली असून त्यापैकी त्यांनी सांगितलेला पहिला पदार्थ आहे बदाम. दररोज सकाळी भिजवलेले ५ ते ६ बदाम खावेत. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

हृदय कायम ठणठणीत ठेवणारे ५ पदार्थ, बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी आणि वजनही राहील नियंत्रणात

दुसरा पदार्थ आहे अक्रोड. दररोज २ ते ३ अक्रोड खावेत. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहातो.

हृदय कायम ठणठणीत ठेवणारे ५ पदार्थ, बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी आणि वजनही राहील नियंत्रणात

तिसरा पदार्थ आहे खजूर. खजूरमध्ये पोटॅशियम आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते पचनक्रिया तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

हृदय कायम ठणठणीत ठेवणारे ५ पदार्थ, बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी आणि वजनही राहील नियंत्रणात

रोज दोन अंजीर खावेत असं डॉक्टर सांगतात. कारण अंजीरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे कोलेस्ट्राॅल नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच हाडंसुद्धा मजबूत होतात.

हृदय कायम ठणठणीत ठेवणारे ५ पदार्थ, बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी आणि वजनही राहील नियंत्रणात

पाचवा पदार्थ आहे पिस्ता. पिस्त्यांमध्ये सगळेच ९ प्रकारचे अमिनो ॲसिड्स असतात. त्यामुळे ते प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत मानले जातात.