1 / 6शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयाचं आरोग्य जपणारे हे काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असणं खूप गरजेचं आहे.2 / 6ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉक्टरांनी dr.rohit.sane या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली असून त्यापैकी त्यांनी सांगितलेला पहिला पदार्थ आहे बदाम. दररोज सकाळी भिजवलेले ५ ते ६ बदाम खावेत. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.3 / 6दुसरा पदार्थ आहे अक्रोड. दररोज २ ते ३ अक्रोड खावेत. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहातो.4 / 6तिसरा पदार्थ आहे खजूर. खजूरमध्ये पोटॅशियम आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते पचनक्रिया तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.5 / 6रोज दोन अंजीर खावेत असं डॉक्टर सांगतात. कारण अंजीरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे कोलेस्ट्राॅल नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच हाडंसुद्धा मजबूत होतात.6 / 6पाचवा पदार्थ आहे पिस्ता. पिस्त्यांमध्ये सगळेच ९ प्रकारचे अमिनो ॲसिड्स असतात. त्यामुळे ते प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत मानले जातात.