शरीरातील लोह कमी करणाऱ्या ५ चुका! तुमचंही हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? बघा कुठे चुकतं... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2024 1:58 PM 1 / 7हिमोग्लोबिन म्हणजेच रक्तातील लोहाचे प्रमाण कमी असण्याचा त्रास बहुतांश महिलांना जाणवतो. त्यामुळे मग अनेकजणींना अशक्तपणा येतो. यालाच ॲनिमिया असंही म्हणतात. (main reasons for iron deficiency)2 / 7रक्तातील लोहाचे प्रमाण सातत्याने कमी असण्यासाठी आपल्याच काही चुका कारणीभूत ठरू शकतात. त्या नेमक्या कोणत्या याविषयी अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन यांनी दिलेली माहिती टाईम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केली आहे. त्याच चुका तुम्ही तर करत नाही ना हे एकदा तपासून घ्या..(5 daily mistakes that cause iron deficiency)3 / 7हिमोग्लोबिन कमी असण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे नाश्ता न करणे. नाश्ता केल्यास आपल्या पोटात कोणते ना कोणते लोहयुक्त पदार्थ नक्कीच जातात. काही दिवस नियमितपणे नाश्ता करा आणि त्यामध्ये लोहयुक्त पदार्थ घ्या...(how to overcome iron deficiency)4 / 7जेवणानंतर किंवा नाश्त्यानंतर लगेचच चहा, कॉफी घेण्याची सवयही हिमोग्लोबिन कमी करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. कारण चहा- काॅफीमध्ये असणारे टॅनिन आणि पॉलीफिनॉल हे घटक अन्नपदार्थांमधील लोह शरीरात शाेषून घेण्यास अडथळा निर्माण करतात. 5 / 7ब्रिटीश जर्नल ऑफ न्यूट्रिशन यांच्या अभ्यासानुसार जर तुम्ही कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन अधिक करत असाल तर त्यामुळेही तुमचे हिमोग्लोबिन कमी होऊ शकते. कॅल्शियमचा ओव्हरडोस अन्नपदार्थांमधील लोह शरीरात मिसळू देण्यास अडथळा आणतो. 6 / 7जर्नल ऑफ न्यूट्रिशन यांच्या अभ्यासानुसार जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही वेगन डाएट फॉलाे करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होण्यावर होऊ शकतो. 7 / 7हिमोग्लोबिन सातत्याने कमी असण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे लोहयुक्त पदार्थ आहारात खूप कमी प्रमाणात असणे. आणखी वाचा Subscribe to Notifications