Join us

डायबिटीस असणाऱ्यांनी दररोज आठवणीने खावे ५ पदार्थ- रक्तातील साखर राहिल नियंत्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 17:01 IST

1 / 6
सुकामेव्याचे असे काही प्रकार आहेत जे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष उपयुक्त ठरतात (5 dry fruits for diabetic people). कारण त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची ही खास माहिती..(5 best nuts and seeds that helps to control blood sugar levels)
2 / 6
पहिला पदार्थ आहे बदाम. युरोपियन जर्नल ऑफ न्यूट्रिशन यांच्या माहितीनुसार बदामामध्ये कमी प्रमाणात असणारे कार्बोहायड्रेट्स आणि जास्त प्रमाणात असणारे फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. शिवाय बदामातून मिळणारे मॅग्नेशियम इन्सुलिन सिक्रीशनसाठी मदत करतात.
3 / 6
डायबिटीस मेटाबोलिक रिसर्च रिव्ह्यू यांच्या माहितीनुसार मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी अक्रोड नियमितपणे खाल्ले पाहिजेत. कारण त्यांचा ग्लाससेमिक इंडेक्स कमी असून त्यांच्यातून भरपूर प्रमाणात ओमेगा ३ फॅटी ॲसिड मिळते.
4 / 6
जर्नल ऑफ रिव्ह्यू डायबेटिक स्टडी यांच्या अभ्यासानुसार प्रोटीन आणि फायबर हे दोन्ही भरपूर प्रमाणात देणारे पिस्तादेखील डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे खायला हवे.
5 / 6
फूड सायन्स अँड न्यूट्रिशन यांच्या मते दररोज रात्री झोपताना काही मनुका पाण्यात भिजत टाकाव्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या खाव्या. यामुळे कमी वेगात ग्लुकोज रक्तामध्ये मिसळले जाते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
6 / 6
भरपूर प्रमाणात फायबर देणाऱ्या अंजीरचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. शिवाय त्यातून पोटॅशियमही भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे अंजीरही नियमित खावे.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेहअन्न