5 food for constipation, how to get relief from constipation
सकाळी जोर लावूनही पोट साफ होत नाही, दिवसांतून २- ३ वेळा जाता? ५ पदार्थ खा- त्रास कमी होईलPublished:August 7, 2024 05:40 PM2024-08-07T17:40:08+5:302024-08-07T17:45:24+5:30Join usJoin usNext काही जण असे असतात की त्याचं सकाळी एकदाच पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. दिवसभरातून थोड्या- थोड्या वेळाने त्यांना सारखं जावं लागतं. (5 food for constipation) असा त्रास होत असेल तर त्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती हॉपकिन्स मेडिकलने प्रकाशित केली आहे. त्यानुसार जर आपण आहारात काही पदार्थ नियमितपणे घेतले तर पोट लवकर साफ होईल. त्यासाठी दिवसांतून २- ३ वेळा जाण्याची अजिबात गरज नाही. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा. (how to get relief from constipation?) रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार बीटरुट, ब्रोकोली, कोबी, गाजर, ग्रीन बीन्स, पालक, ॲव्हाकॅडो असे पदार्थ रोज खायला पाहिजेत. २. याशिवाय सफरचंद, पपई, आंबा, संत्री, किवी, स्ट्रॉबेरी अशी फायबरयुक्त फळही तुमच्या आहारात असावी. ३. मेडिकल न्यूज टुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार जवस आहारात योग्य प्रमाणात असतील तरी कॉन्स्टीपेशनचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. ४. तुमच्या आहारात विटामिन बी ६, पोटॅशियम, फॉलेट, झिंक असे पदार्थ असायला पाहिजेत. यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते. ५. योग्य प्रमाणात पाणी प्या. पाणी पुरेसं प्यायल्यामुळे अन्नपचन होण्यास मदत हाेते. तसेच तुमच्या आहारात पातळ पदार्थ योग्य प्रमाणात घ्या. कोरडं अन्न खाणं टाळा. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सअन्नपाणीHealthHealth TipsfoodWater