5 Food items that controls high blood pressure, How to control blood pressure?
रक्तदाब नियंत्रित ठेवणारे ५ पदार्थ, आहारतज्ज्ञ सांगतात, तब्येत जपायची तर..Published:January 14, 2023 05:56 PM2023-01-14T17:56:09+5:302023-01-14T18:15:46+5:30Join usJoin usNext १. वयाचा आणि रक्तदाबाचा (blood pressure) आता काहीच संबंध राहिलेला नाही. पुर्वी रक्तदाब, मधुमेह असे सगळे आजार वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडल्यानंतरच गाठायचे. पण आता मात्र अगदी तिशी- पस्तिशीची तरुणाईही या आजारांनी त्रस्त आहे. २. म्हणूनच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते खाद्यपदार्थ नियमितपणे खावे, याविषयीची एक पोस्ट आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ५ पदार्थांचा उल्लेख केला आहे. (Food items that controls high blood pressure) ३. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी सुचवलेला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे राजगिरा. राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याच्या पिठाचे थालिपीट असे पर्याय तुम्ही यासाठी निवडू शकता. ४. मटकी देखील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मटकीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. रक्तदाब वाढविण्यासाठी जे एन्झाईम्स काम करतात, त्यांची वाढ नियंत्रित ठेवण्याचं काम पोटॅशियम करतं. ५. केळी- काही अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की शरीरातील सोडियमचे प्रमाण तसेच रक्तवाहिन्यांवरील ताण नियंत्रित ठेवण्यासाठी केळीतील पोटॅशियम उपयुक्त ठरते. ६. नारळाचं पाणीही रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी नारळपाणी पिण्यास हरकत नाही. ७. खजूरमध्येही भरपूर प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम असतं. हे दोन्ही घटक शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सअन्नHealthHealth Tipsfood