Join us   

रक्तदाब नियंत्रित ठेवणारे ५ पदार्थ, आहारतज्ज्ञ सांगतात, तब्येत जपायची तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2023 5:56 PM

1 / 7
१. वयाचा आणि रक्तदाबाचा (blood pressure) आता काहीच संबंध राहिलेला नाही. पुर्वी रक्तदाब, मधुमेह असे सगळे आजार वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडल्यानंतरच गाठायचे. पण आता मात्र अगदी तिशी- पस्तिशीची तरुणाईही या आजारांनी त्रस्त आहे.
2 / 7
२. म्हणूनच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते खाद्यपदार्थ नियमितपणे खावे, याविषयीची एक पोस्ट आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ५ पदार्थांचा उल्लेख केला आहे. (Food items that controls high blood pressure)
3 / 7
३. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी सुचवलेला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे राजगिरा. राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याच्या पिठाचे थालिपीट असे पर्याय तुम्ही यासाठी निवडू शकता.
4 / 7
४. मटकी देखील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मटकीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. रक्तदाब वाढविण्यासाठी जे एन्झाईम्स काम करतात, त्यांची वाढ नियंत्रित ठेवण्याचं काम पोटॅशियम करतं.
5 / 7
५. केळी- काही अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की शरीरातील सोडियमचे प्रमाण तसेच रक्तवाहिन्यांवरील ताण नियंत्रित ठेवण्यासाठी केळीतील पोटॅशियम उपयुक्त ठरते.
6 / 7
६. नारळाचं पाणीही रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी नारळपाणी पिण्यास हरकत नाही.
7 / 7
७. खजूरमध्येही भरपूर प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम असतं. हे दोन्ही घटक शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न