Join us   

फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नयेत ५ गोष्टी, पोषणमूल्यांवर परिणाम आणि आरोग्यासाठी अपायकारण कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2022 3:53 PM

1 / 6
फ्रिज ही हल्ली इतकी सोयीची गोष्ट झाली आहे की अन्न शिळे होऊ नये म्हणून आपण सर्रास ते फ्रिजमध्ये ठेवतो आणि वापरतो. मात्र सगळेच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवून खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे काही वेळा पदार्थाची चव जाते आणि हे पदार्थ आरोग्यासाठीही घातक ठरु शकतात. पाहूया कोणते ५ पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नयेत (5 Foods Should Not Keep In Refrigerator).
2 / 6
बरेचदा केळी लवकर काळी होतात किंवा पिकतात म्हणून आपण ती फ्रिजमध्ये ठेवतो. पण केळी चांगली राहावत यासाठी ती बाहेरच ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे केळी फ्रिजमध्ये ठेवू नयेत.
3 / 6
बरेचदा आपण बाजारातून ब्रेड आणला की तो अर्धा वापरतो आणि अर्धा ब्रेड तसाच राहतो. अशावेळी तो खराब होऊ नये म्हणून आपण तो फ्रिजमध्ये ठेवतो. पण असे करणे योग्य नाही याचे कारण म्हणजे फ्रिजमध्ये ब्रेड ठेवला की तो कडक आणि वातट होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा तो मोकळ्या हवेत बंद करुन ठेवणे केव्हाही चांगले
4 / 6
बटाटे जुने झाले की त्याला मोड यायला लागतात. त्यामुळे काही जण बटाटे फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र बटाटे हे रुम टेम्प्रेचरला ठेवायला हवेत. त्यामुळे बटाटे जास्त चांगले राहतात.
5 / 6
मध फ्रिजमध्ये ठेवला तर तो घट्ट होतो आणि वापरणे अवघड होते. मात्र मध बाहेर खराब होतो अशी आपली समजूत असल्याने आपण तो फ्रिजमध्ये ठेवतो. पण तो बाहेरच कोरड्या ठिकाणी हवाबंद असलेल्या बाटलीमध्ये ठेवायला हवा.
6 / 6
आपण कधी ब्रेडला लावण्यासाठी तर कधी पोळीला लावण्यासाठी बाजारातून जाम आणतो. या जाममध्ये साखर आणि प्रिझर्व्हेटीवचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते बाहेर ठेवले तरी चांगले टिकतात. मात्र आपण तरी ते फ्रिजमध्ये ठेवतो. यामुळे जाम विनाकारण घट्टसर होतो. त्यामुळे जाम बाहेर ठेवला तरी चालतो.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न