उन्हाळ्याच्या दिवसात खूप थकवा येतो? रोज ही ५ फळं खा, हिमोग्लोबिन भरभरून वाढेल

Published:March 1, 2023 11:55 AM2023-03-01T11:55:10+5:302023-03-01T12:12:20+5:30

5 Fruits to Increase Hemoglobin : fruits to increase hemoglobin in summer

उन्हाळ्याच्या दिवसात खूप थकवा येतो? रोज ही ५ फळं खा, हिमोग्लोबिन भरभरून वाढेल

शरीरात रक्ताची कमरता उद्भवल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. या समस्या टाळण्यासाठी हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. उन्हाळ्याच्या दिवसात कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यानं हिमोग्लोबिन वाढतं हे समजून घेऊया.(5 fruits to increase hemoglobin in summer fatigue will also go away guava apple pomegranate)

उन्हाळ्याच्या दिवसात खूप थकवा येतो? रोज ही ५ फळं खा, हिमोग्लोबिन भरभरून वाढेल

मेडिकल न्युज टुडेच्या रिपोर्टनुसार हिमोग्लोबीन एक प्रोटीन आहे जे रेड ब्लड सेल्सच्या स्वरूपात दिसून येतं. हे सेल्स शरीरातील प्रत्येक भागाला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतात. ऑक्सिजन पुरवठ्या व्यतिरिक्त कार्बन डायऑक्साईड पेशींमधून बाहेर काढण्यासाठी या पेशी फायदेशीर ठरतात.

उन्हाळ्याच्या दिवसात खूप थकवा येतो? रोज ही ५ फळं खा, हिमोग्लोबिन भरभरून वाढेल

शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास हे कार्य करणं कठीण होऊ शकतं. शरीरातं हिमोग्लोबिनचं उत्पादन वाढण्यासाठी आयरन, तांबे, व्हिटामीन बी १२, बी आणि व्हिटामीन सी ची महत्वाची भूमिका असते. अशा स्थितीत रोजच्या आहारात काही फळांचा समावेश केल्यास हिमोग्लोबिनचा स्तर वाढू शकतो.

उन्हाळ्याच्या दिवसात खूप थकवा येतो? रोज ही ५ फळं खा, हिमोग्लोबिन भरभरून वाढेल

तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास आहारात आवळ्याचा समावेश करा. आवळ्यात आयर्न, व्हिटामीन सी, एंटीऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात यामुळे शरीरातील रेड ब्लड सेल्सचं प्रोडक्शन वाढतं आणि हिमोग्लोबिनची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.

उन्हाळ्याच्या दिवसात खूप थकवा येतो? रोज ही ५ फळं खा, हिमोग्लोबिन भरभरून वाढेल

डाळिंबात (Pomegranate) व्हिटामीन सी आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असते. व्हिटामीन सी आपल्या शरीरातील आयर्न वाढवते. यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. डाळिंबात मॅग्नेशियम, कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर असते रोज एक ग्लास डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्यास हिमोग्लोबिन वेगानं वाढण्यास मदत होते.

उन्हाळ्याच्या दिवसात खूप थकवा येतो? रोज ही ५ फळं खा, हिमोग्लोबिन भरभरून वाढेल

लिंबात व्हिटामीन (Lemon) सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे शरीरातील लोगाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. आहरात लिंबाचा समावेश केल्यास व्हिटामीन सी आणि आयर्न दोन्ही वाढते.

उन्हाळ्याच्या दिवसात खूप थकवा येतो? रोज ही ५ फळं खा, हिमोग्लोबिन भरभरून वाढेल

सफरचंदाच्या (Apple) सेवनानं तब्येतीला अनेक फायदे मिळतात. यातील पोषक तत्वांमध्ये आयर्न असते. याचे नियमित सेवन केल्यानं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

उन्हाळ्याच्या दिवसात खूप थकवा येतो? रोज ही ५ फळं खा, हिमोग्लोबिन भरभरून वाढेल

पेरूमध्ये (Guava) लोहही मुबलक प्रमाणात आढळते. ते जितके जास्त पिकलेले असेल तितके जास्त लोह त्यात असते. याशिवाय त्यात व्हिटॅमिन सी देखील आढळते. आहारात केळी, सुका मेवा इत्यादींचाही समावेश करू शकता.