5 Home remedies for headache, How to get rid of headache?
सतत डोकेदुखीचा त्रास? सतत डोक्याला पट्टी बांधून पेनकिलर खाता, करून बघा ५ उपायPublished:October 5, 2022 04:36 PM2022-10-05T16:36:50+5:302022-10-05T16:40:01+5:30Join usJoin usNext १. काही जणींचं सारखं डोकं दुखतं. आठवड्यातून एक- दोन वेळा तर त्या हमखास डोकं धरून बसलेल्या दिसतात. समोरच्याला लक्षात येत नसलं किंवा वरून जाणवत नसला तरी हा त्रास एवढा भयानक असतो, की कधी कधी काय करावं कळत नाही. २. मग शेवटी नाईलाजाने अनेक जणी गोळ्या घेऊन मोकळ्या होतात. एक गोळी घ्यायची, थोडा आराम करायचा की लगेच डोकेदुखी थांबली.. असा हा सोपा उपाय. पण प्रत्येकवेळी डोकेदुखीसाठी असं गोळ्या- औषधी घेणं मुळीच चांगलं नाही. ३. त्यामुळेच तर डोकेदुखी थांबविण्यासाठी लगेचच औषधं घेण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करून बघा. डोकेदुखी कमी होऊन लवकर फ्रेश वाटण्यास मदत होऊ शकते. ४. डोकेदुखी होत असल्यास शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी केवळ पाणी पिणं पुरेसं नाही. पाण्यासोबतच तुमच्या शरीरात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे घटकही जाणं गरजेचं आहे. त्यामुळे एक ग्लास पाण्यात एक चुटकीभर Celtic Sea Salt टाकून प्या. ५. कम्प्युटर, लॅपटॉप यावर काम करताना सतत मान खाली असते आणि नजर स्क्रिनवर. या बॉडी पोश्चरमुळेही डाेकेदुखी होऊ शकते. कारण त्यामुळे मानेच्या वरच्या भागात म्हणजेच डोक्याच्या खालच्या भागावर ताण येतो. त्यामुळे मान हलवा आणि मान, पाठ स्ट्रेच होईल असे काही व्यायाम करा. ६. मोकळ्या हवेत गेल्यानेही डोकेदुखी कमी होऊ शकते. कधी कधी बंदिस्त खोलीत अधिक वेळ बसल्याने तिथे ऑक्सिजन कमी हाेतो. कार्बन डाय ऑक्साईड वाढतो. त्यामुळे मग थकवा येणं, जीव गुदमरणं, डोकेदुखी असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे थोडं मोकळ्या हवेत जाऊन बघा. ७. काही ठिकाणी असणारे फ्लुरोसंट उजेडाचे किंवा अति चमकदार एलईडी लाईटदेखील डोकेदुखीसाठी कारणीभुत ठरतात. ८. मोकळ्या हवेत चालण्यानेही डाेकेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. बाहेर पडल्यावर मिळणारी फ्रेश हवा आणि मोकळा ऑक्सिजन तुम्हाला रिफ्रेश करण्यासाठी मदत करू शकतो. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीHealthHealth TipsHome remedy