Join us

डिहायड्रेशनची ५ लक्षणं वेळीच ओळखा- शरीराला पाणी कमी पडणं धोकादायक ठरू शकतं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2025 17:01 IST

1 / 7
आपण पाणी भरपूर पितो, त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही (causes and symptoms of dehydration), असं तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात.(5 major symptoms of dehydration)
2 / 7
कारण भरपूर पाणी प्यायलं तरी ते घामाद्वारे किंवा लघवीद्वारे शरीराच्या बाहेर पडतं. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. हा त्रास होऊनही अनेकांना तो लक्षात येत नाही. कारण डिहायड्रेशनची लक्षणंच आपल्याला माहिती नसतात. म्हणूनच ही काही लक्षणं तुम्हाला जाणवू लागली तर ते कदाचित डिहायड्रेशनमुळे असू शकतं..(how to identify your body is getting dehydrated?)
3 / 7
डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी पडते, तळपायांच्या भेगा वाढतात.
4 / 7
ओठ फुटतात, सतत कोरडे पडतात किंवा त्यांच्यावर चिरा पडून त्यातून रक्तही येते..
5 / 7
बराच वेळ बसून उठल्यानंतर बारीक चकरा आल्यासारखं होत असेल, डोळ्यांसमोर अंधारी येत असेल तर ते सुद्धा डिहायड्रेशनचं एक लक्षण असू शकतं.
6 / 7
ज्या लोकांच्या शरीरातलं पाणी कमी होतं म्हणजेच ज्यांना डिहायड्रेशनचा त्रास होतो त्या लोकांच्या लघवीचा रंग गडद पिवळा असतो. असं वारंवार होत असल्यास त्याचा परिणाम किडनीवरही होऊ शकतो.
7 / 7
डिहायड्रेशन झाल्यामुळे स्नायूंची ताकदही कमी होते. त्यामुळे मग अंग दुखणे, थकवा येणे, आळस असा त्रास होऊ शकतो.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससमर स्पेशलपाणी