पोटाचे आजार वाढण्याची ५ मुख्य कारणं- जेवण झाल्यानंतर ९० टक्के लोक 'या' चुका करतात

Updated:April 24, 2025 09:30 IST2025-04-24T09:23:17+5:302025-04-24T09:30:02+5:30

पोटाचे आजार वाढण्याची ५ मुख्य कारणं- जेवण झाल्यानंतर ९० टक्के लोक 'या' चुका करतात

अपचन, ॲसिडीटी, गॅसेस होणे, पोट गच्चं होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे असे त्रास अनेक जणांना नेहमीच होत असतात. त्यासाठी आपण करतो त्याच काही चुका कारणीभूत आहेत.(5 mistakes that causes indigestion issue)

पोटाचे आजार वाढण्याची ५ मुख्य कारणं- जेवण झाल्यानंतर ९० टक्के लोक 'या' चुका करतात

याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी gunjanshouts या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली असून अपचनाशी संबंधित त्रास टाळायचे असतील तर जेवण झाल्यानंतर ५ चुका टाळायलाच पाहिजेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.(5 things to avoid after meal)

पोटाचे आजार वाढण्याची ५ मुख्य कारणं- जेवण झाल्यानंतर ९० टक्के लोक 'या' चुका करतात

त्यापैकी पहिली गाेष्ट म्हणजे जेवण झाल्यानंतर लगेचच चहा किंवा काॅफी घेणे. यामुळे आहारातील पौष्टिक घटक रक्तामध्ये व्यवस्थित शोषून घेतले जात नाहीत. त्यामुळे पोषण मिळत नाही.

पोटाचे आजार वाढण्याची ५ मुख्य कारणं- जेवण झाल्यानंतर ९० टक्के लोक 'या' चुका करतात

जेवण झाल्यानंतर लगेचच झोपणे. यामुळे ॲसिडीटी, पोट फुगणे असे त्रास होऊ शकतात.

पोटाचे आजार वाढण्याची ५ मुख्य कारणं- जेवण झाल्यानंतर ९० टक्के लोक 'या' चुका करतात

जेवण झाल्यानंतर अनेक जणांना फळं खाण्याची सवय असते. ती देखील अतिशय चुकीची आहे. कारण जेवणानंतर लगेच फळं खाल्ल्यामुळे गॅसेस होतात.

पोटाचे आजार वाढण्याची ५ मुख्य कारणं- जेवण झाल्यानंतर ९० टक्के लोक 'या' चुका करतात

जेवण झाल्यानंतर लगेचच आंघोळ केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह बिघडतो आणि त्यामुळे अपचनासारखे त्रास होतात.

पोटाचे आजार वाढण्याची ५ मुख्य कारणं- जेवण झाल्यानंतर ९० टक्के लोक 'या' चुका करतात

जेवण झाल्यानंतर लगेचच ब्रश करू नये. कारण असं केल्यामुळे दातांवरचा एनॅमल कमी होऊ शकतो.