टूथब्रश बदलण्याची योग्य वेळ कोणती? ५ गोष्टी तपासा, १०० रुपयांचा ब्रश बदला- बसेल हजारोंचा फटका...

Updated:February 12, 2025 19:16 IST2025-02-12T19:02:24+5:302025-02-12T19:16:23+5:30

5 Reasons to Change Your Toothbrush Regularly : Why You Need to Change Your Toothbrush More Often : How Often Should You Change Your Toothbrush : 5 Signs That It's Time to Change Your Toothbrush : टूथब्रश नेमका कधी बदलला पाहिजे, किंवा टूथब्रश बदलण्याची योग्य वेळ कोणती ते पाहूयात.

टूथब्रश बदलण्याची योग्य वेळ कोणती? ५ गोष्टी तपासा, १०० रुपयांचा ब्रश बदला- बसेल हजारोंचा फटका...

सकाळी उठल्या उठल्या संपूर्ण तोंड आणि दातांच्या स्वच्छतेसाठी आपण ब्रश करतो. ओरल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी वापरले जाणारे टूथब्रश आपण काहीवेळा खूप दीर्घकाळ वापरतो. एकदा वापरायला काढलेले टूथब्रश आपण महिनोन्महिने न बदलता तेच वापरतो. परंतु अशा प्रकारे एकच ब्रश खूप दीर्घकाळ वापरल्याने ओरल हेल्थ (5 Reasons to Change Your Toothbrush Regularly) खराब होऊ शकते.

टूथब्रश बदलण्याची योग्य वेळ कोणती? ५ गोष्टी तपासा, १०० रुपयांचा ब्रश बदला- बसेल हजारोंचा फटका...

टूथब्रश बरेच महिने वापरुन झाल्यावर ते खराब (5 Signs That It's Time to Change Your Toothbrush ) झाले की आपण फेकून देतो. परंतु टूथब्रश वापरुन खराब झाल्यावर तर फेकून देतोच परंतु अशा काही विशेष ५ गोष्टी आहेत तेव्हा देखील आपल्याला हा वापरलेला टूथब्रश फेकून दिला पाहिजे. त्या कोणत्या ते पाहूयात.

टूथब्रश बदलण्याची योग्य वेळ कोणती? ५ गोष्टी तपासा, १०० रुपयांचा ब्रश बदला- बसेल हजारोंचा फटका...

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) आणि इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) नुसार, टूथब्रश दर ३ ते ४ महिन्यांनी बदलला पाहिजे. याशिवाय ब्रश नेमका कधी बदलला पाहिजे, किंवा टूथब्रश बदलण्याची योग्य वेळ कोणती ते पाहूयात.

टूथब्रश बदलण्याची योग्य वेळ कोणती? ५ गोष्टी तपासा, १०० रुपयांचा ब्रश बदला- बसेल हजारोंचा फटका...

जर टूथब्रशचे ब्रिसल्स सैल किंवा वाकडे झाले असतील तर ते बदला.

टूथब्रश बदलण्याची योग्य वेळ कोणती? ५ गोष्टी तपासा, १०० रुपयांचा ब्रश बदला- बसेल हजारोंचा फटका...

जर काही ब्रिसल्स तुटले असतील तर टूथब्रश लगेचच बदला. वाकड्या आणि पसरलेल्या ब्रिसल्समुळे दात व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत.

टूथब्रश बदलण्याची योग्य वेळ कोणती? ५ गोष्टी तपासा, १०० रुपयांचा ब्रश बदला- बसेल हजारोंचा फटका...

जर तुम्ही खूप जोरात ब्रश करत असाल तर दर महिन्याला टूथब्रश बदला. खूप जलद गतीने आणि जबरदस्तीने ब्रश करणे ओरल हेल्थसाठी चांगले नाही. बरेचदा घरातील लहान मुले स्वतः खूप वेगाने ब्रश करतात, अशावेळी पालकांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे.

टूथब्रश बदलण्याची योग्य वेळ कोणती? ५ गोष्टी तपासा, १०० रुपयांचा ब्रश बदला- बसेल हजारोंचा फटका...

जर तुम्ही दीर्घकाळ आजारी असाल किंवा मोठ्या आजारातून बरे झाला असाल तर अशावेळी ब्रश बदला. कारण या काळात वापरलेला ब्रश बदलणे आवश्यक असते. कारण आजारपणात बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजंतूंचे प्रमाण वाढते, जा आपल्या ब्रशवर हस्तांतरित होतात.

टूथब्रश बदलण्याची योग्य वेळ कोणती? ५ गोष्टी तपासा, १०० रुपयांचा ब्रश बदला- बसेल हजारोंचा फटका...

जर तुम्ही इलेक्ट्रिक टूथब्रश वापरत असाल तर या टूथब्रशचे हेड म्हणजेच ब्रिसल्सकडचा भाग दर ३ ते ५ महिन्यांनी बदलावा. त्याचबरोबर हे इलेक्ट्रिक टूथब्रश दर ३ ते ५ वर्षांनी बदलणे गरजेचे असते. बऱ्याच इलेक्ट्रिक टूथब्रश मध्ये इनबिल्ट कलर इंडिकेटर असतात, जे ब्रश वापरुन खराब झाल्यावर रंग बदलून ब्रश बदलण्याचे संकेत देतात.