तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, हे सांगणारी ४ लक्षणं- त्यांच्याकडे दुर्लक्ष नकोच...

Published:February 23, 2024 09:11 AM2024-02-23T09:11:06+5:302024-02-23T09:15:01+5:30

तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, हे सांगणारी ४ लक्षणं- त्यांच्याकडे दुर्लक्ष नकोच...

रक्तदाब वाढणं हे थेट आपल्या हृदयाशी संबंधित असतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी बरेच जण व्यायाम, आहार याद्वारे प्रयत्न करतातच. पण तरीही एवढं करूनही रक्तदाबाचा धोका निर्माण होऊ शकतोच...

तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, हे सांगणारी ४ लक्षणं- त्यांच्याकडे दुर्लक्ष नकोच...

म्हणूनच रात्री झोपेदरम्यान जाणवणाऱ्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, हे सांगणारी ती लक्षणे असू शकतात, अशी माहिती npj Digital Medicine यांच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहेत. ती लक्षणे नेमकी कोणती ते पाहा...

तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, हे सांगणारी ४ लक्षणं- त्यांच्याकडे दुर्लक्ष नकोच...

या अभ्यासात सांगण्यात आलेलं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे रात्री झोपेत घोरणे. रात्री खूप घोरत असाल आणि त्यामुळे श्वासामध्ये गॅप पडत असेल तर ते एक रक्तदाबाचा धोका असण्याचं लक्षण असू शकतं. त्यालाच sleep apnoea असंही म्हणतात.

तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, हे सांगणारी ४ लक्षणं- त्यांच्याकडे दुर्लक्ष नकोच...

रात्री कधीही शांत झोप न लागणे. महिन्यातून एक- दोनदा क्वचित कधीतरी हा त्रास झाला तर ठिक. पण कधीही शांत झोप लागत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, हे सांगणारी ४ लक्षणं- त्यांच्याकडे दुर्लक्ष नकोच...

रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागत असेल तर ते ही एक काळजी करण्याचं कारण असू शकतं. रक्तदाब वाढल्याने किडनीवर ताण येतो. त्याचा परिणाम म्हणून वारंवार वॉशरूमला जावं लागतं.

तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, हे सांगणारी ४ लक्षणं- त्यांच्याकडे दुर्लक्ष नकोच...

रात्रीच्या वेळी आणि सकाळी उठल्यानंतर काही तासांमध्ये डोकेदुखीत्रा त्रास वारंवार होत असेल तर डॉक्टरांना दाखवा.

तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, हे सांगणारी ४ लक्षणं- त्यांच्याकडे दुर्लक्ष नकोच...

ही सगळी लक्षणं एकाचवेळी जाणवत असतील तर त्याचा आणि रक्तदाबाचा संबंध असू शकतो. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे सगळ्यात उत्तम.