1 / 8आपल्या बाथरुममध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आपला वेळ वाचावा आणि वेळेत गोष्टींकडे लक्ष जावे यासाठी आपण बाथरुममध्ये अशा काही गोष्टी ठेवतो ज्यामुळे आरोग्य बिघडते. (things not to store in bathroom)2 / 8बाथरुममध्ये काही नियम न पाळल्यास स्वच्छ बाथरुम देखील जिवजंतूंचे घर बनू शकते. जर आपल्याही बाथरुममध्ये या गोष्टी आपण ठेवत असू तर आजच काढून फेकून द्या. (bathroom storage mistakes)3 / 8अनेक बाथरुममध्ये व्हॅनिटी काउंटर टॉप्स लहान असतात. त्यामुळे कमी जागेत आणखी काय ठेवता येईल असा आपला विचार असतो. त्यामुळे बाथरुममध्ये काही गोष्टी ठेवणे आपण टाळायला हवे. (common health risks in bathrooms)4 / 8आपल्या बाथरुममध्ये कोणत्याही सजावटीच्या वस्तू ठेवू नका. ज्याचा वापर बाथरुममध्ये असेल. न वापरणाऱ्या वस्तूमुळे घाण किंवा धुळ साचून राहाते. 5 / 8टूथब्रश कधीही बाथरुममध्ये ठेवू नका. अनेकदा टूथब्रशवर आपण कॅप लावत नाही. ज्यामुळे त्यावर जंतू घर करुन बसतात. त्यासाठी टूथब्रश हा मेडिसिन कॅबिनेटमध्ये किंवा व्हॅनिटी स्टोरेजमध्ये ठेवा. 6 / 8स्किन केअरच्या कोणत्याही वस्तू बाथरुममध्ये ठेवू नका. बाथरुम हे जंतूंचे घर समजले जाते. ज्यामुळे आपण रोज वापरणाऱ्या वस्तूंवर जंतू असू शकतात. यामुळे आपली त्वचेचा पोत बिघडू शकतो. 7 / 8टॉवेल हा बाथरुममध्ये उघड्यावर ठेवणे कधीही वाईट. बाथरुममध्ये टॉवेल लवकर ओले आणि घाणेरडे होतात. टॉवेल वापरुन झाला की, तो योग्य जागेवर ठेवा. ओले कपडे ठेवल्याने बुरशी आणि जीवाणू वाढतात. 8 / 8लहान बाथरुममध्ये काउंटर टॉपची जागा कमी असते. काउंटर टॉप सिंक हा चांगला पर्याय नाही. यामुळे जंतू थेट आपल्या शरीरात जाऊ शकतात.