1 / 8बदललेली जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. त्यापैकीच एक आजार म्हणजे कॅन्सर..(5 toxic things people should never use)2 / 8आज कॅन्सरवर अनेक उपचार निघाले असून त्यातून पुर्णपणे बरं होणंही शक्य आहे. पण तरीही कॅन्सरची भीती मनातून जात नाही. कॅन्सरमधून बरे झालेले लोक किंवा ज्यांना कॅन्सरचे निदान झालेले आहे, असे रुग्ण त्यांच्या रोजच्या जीवनशैलीत कित्येक बदल करतात.(5 daily use products may increase the risk of cancer)3 / 8कारण रोजच्या वापरातल्याच काही वस्तू कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरतात, असं तज्ज्ञ सांगतात. जर तेच बदल अगदी सुरुवातीपासून केले तर कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी करता येऊ शकतो, अशी माहिती डॉ. मनेंद्र यांनी इंडियन एक्सप्रेसला दिली आहे. ते बदल नेमके कोणते ते पाहूया..4 / 8बहुतांश लोक डिओड्रंट वापरतात. त्यामध्ये ॲल्युमिनियम कम्पाउंड असतात. त्यांच्या अतिवापरामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते.5 / 8लाँड्री डिटर्जंट, क्लिनिंग प्रोडक्ट्समध्ये फ्थेलेट्स, VOCs असे काही सिंथेटिक सुगंध असतात जे कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतात. 6 / 8ज्या टुथपेस्टमध्ये खूप जास्त प्रमाणात फ्लोराईड असते असे टुथपेस्ट डेंटल फ्लोरोसिस सारख्या आजारांना कारणीभूत ठरू शकते.7 / 8बहुतांश शाम्पूमध्ये पॅराबिन्स आणि सिंथेटिक सुगंध असतात जे आराेग्यासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे पॅराबिन फ्री शाम्पू वापरण्यास प्राधान्य द्यावे.8 / 8यासोबतच साबण, माॅईश्चरायजर, बॉडी लोशन अशा स्किन प्रोडक्ट्समध्येही पॅराबिन्स आणि फ्थेलेट्स असे कॅन्सरचा धोका वाढविणारे हानिकारक पदार्थ असतात. त्यामुळे शक्य तेवढ्या वस्तू नॅचरल किंवा हर्बल स्वरुपातल्या वापरायला हव्या, असंं तज्ज्ञ सांगतात.