5 types of green leaf that helps to reduce ldl or bad cholesterol
शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणारी ५ हिरवी पानं, हृदयरोगाचा धोका कमी करायचा तर...Published:August 6, 2024 09:11 AM2024-08-06T09:11:31+5:302024-08-06T09:15:01+5:30Join usJoin usNext चुकीची आहारपद्धती, व्यायामाचा अभाव यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्राॅलचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे सध्या कमी वयात हृदयरोग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पंचविशी, तिशीतल्या तरुण मंडळींना हार्ट अटॅक आल्याच्या कित्येक घटना आपण ऐकतो. म्हणूनच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करायचे असेल तर कोणत्या हिरव्या भाज्या उपयोगी ठरतात, याविषयी रिसर्च गेटने दिलेली माहिती झीन्यूजने प्रकाशित केली आहे. यापैकी पहिले आहे शेवग्याचा पाला किंवा पाने. या पानांमध्ये असणारे गुणधर्म रक्तवाहिन्या स्वच्छ करून शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यात मदत करतात. तुळशीमध्ये असणारे ॲण्टीइन्फ्लामेट्री आणि ॲण्टी ऑक्सिडंट्स LDL म्हणजेच बॅड काेलेस्ट्रॉल कमी करतात. शरीरातील LDL ची पातळी कमी करण्यासाठी कडुलिंबाची पानंही खूप उपयोगी ठरतात असं त्या रिसर्चमध्ये सांगितलं आहे. कडिपत्तादेखील अतिशय उपयुक्त असून तो रोजच्या आहारात नियमितपणे असावा, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. मेथीच्या पानांमधले फायबर आणि इतर पौष्टिक घटक बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सअन्नहृदयविकाराचा झटकाहृदयरोगHealthHealth TipsfoodHeart AttackHeart Disease