जुने खराब अंडरगारमेंट्स वारंवार घालणं फार धाेक्याचं, अंडरगारमेंट्सबाबत कायम लक्षात ठेवा ५ गोष्टी

Published:April 2, 2023 05:01 PM2023-04-02T17:01:07+5:302023-04-03T14:57:37+5:30

5 underwear mistakes that may impact your health badly : बरेच लोक अंडरवेअर धुण्यासाठी सुगंधी डिटर्जंट वापरतात, जे चुकीचे आहे.

जुने खराब अंडरगारमेंट्स वारंवार घालणं फार धाेक्याचं, अंडरगारमेंट्सबाबत कायम लक्षात ठेवा ५ गोष्टी

वैयक्तीक स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार तर कधी अंतर्गत अवयवांचे गंभीर इन्फेक्शन उद्भवण्याचा धोका असतो. 2019 मध्ये अंडरगारमेंट्स निर्मात्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, 45 टक्के लोक दोन किंवा त्याहून अधिक दिवस एकच अंडरवेअर घालतात. बहुतांश पुरुष एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ एकच अंडरवेअर घालतात. बहुतेक लोकांना असे वाटते की अनेक दिवस एकच अंडरवेअर घातल्याने त्यांच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. असे असताना अजिबात नाही.

जुने खराब अंडरगारमेंट्स वारंवार घालणं फार धाेक्याचं, अंडरगारमेंट्सबाबत कायम लक्षात ठेवा ५ गोष्टी

अंडरवेअर अनेक दिवस न धुता घातल्याने अनेक गंभीर आजारांना तुम्ही बळी पडू शकता. काही चुकांकडे वेळीच लक्ष दिल्यास प्रायव्हेट पार्टसोबतच संपूर्ण आरोग्य उत्तम ठेवता येईल.

जुने खराब अंडरगारमेंट्स वारंवार घालणं फार धाेक्याचं, अंडरगारमेंट्सबाबत कायम लक्षात ठेवा ५ गोष्टी

अंडरवेअर खरेदी करताना अनेक लोक चूक करतात आणि ती म्हणजे कॉटनऐवजी इतर फॅब्रिकची अंडरवेअर खरेदी करतात. अंडरवेअर खरेदी करताना नेहमी सुती कापड निवडावे. अंतर्वस्त्राचा मध्यभाग भाग सुती असावा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा ओलावा लवकर शोषला जाईल.

जुने खराब अंडरगारमेंट्स वारंवार घालणं फार धाेक्याचं, अंडरगारमेंट्सबाबत कायम लक्षात ठेवा ५ गोष्टी

ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकोलॉजीमध्ये 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, कॉटन अंडरवेअर न घातल्याने यीस्ट इन्फेक्शनचा धोका वाढतो. पॉलिस्टर आणि सिंथेटिक सारख्या कपड्यांपासून बनवलेले अंडरवेअर तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सला हानी पोहोचवू शकतात. कारण हे कापड पाणी शोषणारे नसते. यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याचा धोका असतो.

जुने खराब अंडरगारमेंट्स वारंवार घालणं फार धाेक्याचं, अंडरगारमेंट्सबाबत कायम लक्षात ठेवा ५ गोष्टी

प्रत्येकाने त्यांच्या आकारापेक्षा लहान अंडरवेअर घालणे टाळावे कारण यामुळे तुमचे प्रायव्हेट पार्ट्स घामाने ओले होऊन गरम होऊ शकतात. यासोबतच प्रायव्हेट पार्टमध्ये इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. घट्ट अंडरवेअरमुळे 'व्हल्वोडायनिया' नावाची वेदनादायक स्थिती उद्भवू शकते. यामुळेच नेहमी अशा अंडरवेअरची निवड केली पाहिजे जी पूर्णपणे फिट होईल, म्हणजेच खूप घट्ट किंवा खूप सैलही नाही.

जुने खराब अंडरगारमेंट्स वारंवार घालणं फार धाेक्याचं, अंडरगारमेंट्सबाबत कायम लक्षात ठेवा ५ गोष्टी

बरेच लोक अंडरवेअर धुण्यासाठी सुगंधी डिटर्जंट वापरतात, जे चुकीचे आहे. तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सची त्वचा मऊ आणि संवेदनशील असते, त्यामुळे तुमचे अंडरवेअर धुण्यासाठी सुगंधयुक्त डिटर्जंट वापरणे टाळा. कारण त्यामुळे जळजळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. सुगंधित डिटर्जंटमध्ये असलेल्या रसायनांमुळे खाज सुटते. त्यामुळे त्यांचा वापर टाळण्याचा प्रयत्न करा.

जुने खराब अंडरगारमेंट्स वारंवार घालणं फार धाेक्याचं, अंडरगारमेंट्सबाबत कायम लक्षात ठेवा ५ गोष्टी

अंडरवेअरवरील डिस्चार्जच्या रंगावर लक्ष ठेवा. कारण हा डिस्चार्ज तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट पार्टच्या आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगू शकतो. जर तुम्हाला पांढऱ्या रंगाचा स्त्राव असेल तर ते सामान्य आहे, परंतु जर तुम्हाला हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा स्त्राव असेल तर तुम्हाला बॅक्टेरियल वेजिनोसिस असण्याची शक्यता आहे. जेव्हा योनीमध्ये बॅक्टेरियाची संख्या वाढते तेव्हा हा आजार होतो.